शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST

गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी अधिक मजबूत व्हावी व कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह ...

गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी अधिक मजबूत व्हावी व कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मुक्तीपथची बैठक झाली होती. त्यामध्ये ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्यानुसार, उपविभाग स्तरावरील बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या एटापल्ली पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र हालेवारा, कसनसूर, कोटमींतर्गत गावातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे नियोजन व एटापल्ली तालुक्यातील त्रासदायक गावांची व दारू तंबाखू विक्रेत्यांची यादी तयार करण्यात आली. पोलीस स्टेशनला अवैध दारूच्या तक्रारी १५ दिवसात निकाली काढणे, दर महिन्याला तालुका पोलीस अधिकारी, पोलीस बिट अंमलदार, पोलीस पाटील, मुक्तीपथ तालुका संघटक यांची बैठक होणे गरजेचे आहे. ज्या गावात किंवा वाॅर्डात रेड करणे आहे. त्या गावातील पोलीस पाटील यांनी अवैध दारूविक्रेत्यांची माहिती देणे गरजेचे आहे. दर दोन महिन्यांतून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन तालुक्यात आलेल्या अडचणींवर चर्चा करून निर्णय घेणे. ज्या गावात रेड करायची आहे, त्याचे नियोजन व दर आठवड्यातून पाठपुरावा घेणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील दारू व तंबाखू विक्रेत्यांवर ॲक्शन प्लॅननुसार कारवाई झाल्यास दारू व तंबाखूमुक्त तालुका निर्माण होण्याची शक्यता आहे.