शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पतीने सुपारी देऊन केली कनिकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

संजयची १० दिवसांची पोलीस कोठडी ६ जूनला संपली. त्याला  अहेरी न्यायालयाने  न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संजय बिश्वासचा पंचायत संकुलमध्ये अनेक वर्षांपासून फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. पत्नीसह तिथेच राहणे व व्यवसाय करणे असा त्यांचा नित्यक्रम सुरू असताना २३ मेच्या रात्री कनिकाची हत्या करण्यात आली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : येथे फोटो स्टुडिओचा व्यवसाय करणारे संजय बिश्वास (३५) यांनीच त्यांची पत्नी कनिका (३२) हिची सुपारी देऊन हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी पती संजय याला आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्याचा पीसीआर आटोपल्याने त्याची चंद्रपूर जेलमध्ये रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणातील इतर आरोपींचा आता शोध सुरू आहे. संजयची १० दिवसांची पोलीस कोठडी ६ जूनला संपली. त्याला  अहेरी न्यायालयाने  न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संजय बिश्वासचा पंचायत संकुलमध्ये अनेक वर्षांपासून फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. पत्नीसह तिथेच राहणे व व्यवसाय करणे असा त्यांचा नित्यक्रम सुरू असताना २३ मेच्या रात्री कनिकाची हत्या करण्यात आली. एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, ठाणेदार विजयानंद पाटील यांनी अल्पावधीतच या खुनाचा छडा लावण्यात यश मिळविले. अधिक तपास अधिकारी एपीआय मंदार पुरी करीत आहेत. यात उपनिरीक्षक रविकांत काबंळे व पोलिसांनी परिश्रम घेतले.

अखेर आरोपीने दिली हत्येची कबुली -    घटनेच्या दिवशी बिश्वास दाम्पत्याचा १० वर्षांचा मुलगा एटापल्लीच्या बंगाली वॉर्डातील कनिकाच्या आईच्या घरी होता. तर संजयने बाहेरगावी गेल्याचा देखावा केला. कनिका एकटीच घरात होती. त्याच रात्री कनिकाची हत्या करण्यात आली. संजयने दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर माझ्या पत्नीची हत्या झाली, असा देखावा केला. पोलिसांनी संशयावरून २८ मे रोजी संजयला अटक करून १० दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. यात त्याने आपणच पत्नीची हत्या सुपारी देऊन केल्याची कबुली दिली. हत्या करणारा आरोपी परप्रांतीय असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी