शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह विद्यार्थ्यांसमोर उपासमारीचे संकट

By admin | Updated: July 21, 2014 00:11 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीच्यावतीने भोजन पुरवठा निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. तसेच कार्यरत गृहपालांनी जुन्या भोजन कंत्राटदारांकडे भोजन पुरवठा

अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीच्यावतीने भोजन पुरवठा निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. तसेच कार्यरत गृहपालांनी जुन्या भोजन कंत्राटदारांकडे भोजन पुरवठा करण्याची जबाबदारी सोपविली नाही. यामुळे अहेरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसमोर उपासमारीचे संकट ओढावले आहे. प्रकल्प कार्यालयाच्यावतीने वसतिगृहात भोजनाची व्यवस्था न केल्यास अहेरी प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दिला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत अहेरी येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह सुरू आहे. मात्र येथील कार्यरत गृहपालाच्या भोंगळ कारभारामुळे या वसतीगृहात अनेक समस्या निर्माण झाले आहेत. परिणामी येथील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी केला आहे. या वसतीगृहात सध्या किती विद्यार्थी राहत आहेत. याची माहितीही अहेरी प्रकल्प कार्यालयाला देण्यात आली नाही. तशी यादीही वसतिगृहाच्या फलकावर लावण्यात आली नाही. कार्यरत गृहपालांनी संबंधित जुन्या कंत्राटदाराला भोजनाची व्यवस्था करण्याबाबत सांगितले नाही. यामुळे विद्यार्थ्यांपुढे भोजनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला असल्याचेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. भोजनाची व्यवस्था करण्यासंदर्भात वसतीगृहातील विद्यार्थी शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कार्यरत गृहपाल तडस यांच्या निवासस्थानाकडे गेले. मात्र त्यांच्या निवासस्थानाला कुलूप लावले होते, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. गृहपाल तडस हे या वसतिगृहात रूजू झाल्यापासून येथील विद्यार्थ्यांसोबत कोणत्याही बाबतीत संवाद साधन नाही. स्वगावी गेल्यावर तीन ते चार दिवस ते गैरहजर असतात. यामुळे त्यांचे वसतिगृहातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. वसतिगृहाकडे प्रकल्प कार्यालय प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)