दीड वर्षापासून गृहकर्ज प्रकरणे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:28+5:302021-02-05T08:53:28+5:30

गडचिराेली : राज्यातील जवळपास तीन हजार पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी घर बांधण्याकरिता गृहकर्ज मिळावे म्हणून अर्ज दाखल ...

Home loan cases have been stalled for a year and a half | दीड वर्षापासून गृहकर्ज प्रकरणे रखडली

दीड वर्षापासून गृहकर्ज प्रकरणे रखडली

गडचिराेली : राज्यातील जवळपास तीन हजार पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी घर बांधण्याकरिता गृहकर्ज मिळावे म्हणून अर्ज दाखल केला हाेता. परंतु, अद्यापही गृहकर्ज उपलब्ध झाले नाही. त्यामुळे रखडलेले गृहकर्ज प्रकरणे लवकर मंजूर करावी, अन्यथा पाेलीस बाॅईज असाेसिएशनच्या वतीने मंत्रालयासमाेर तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

राज्यभरातील पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज मंजुरीसाठी अर्ज सादर केले हाेते. परंतु, या अर्जांवर शासनाने कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर केली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले आहे. मात्र, काहीच हालचाली दिसून येत नाही. हक्काचे घर नसल्याने पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकर प्रकरणे मंजूर करावी. तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दीडपट वेतन द्यावे, अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष गिरीश कोरामी, आकाश ढाली, अक्षय उसेंडी, श्रीकांत कोडापे, मनोज धरणी, दीपक बोलीवार, अभिलाष येनगंटीवार, ओमप्रकाश वटी, तिशांत वाचामी उपस्थित होते.

Web Title: Home loan cases have been stalled for a year and a half