शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराची हायटेक तपासणी

By admin | Updated: September 22, 2014 23:19 IST

पोषण आहाराबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन राज्य शासनाने स्वतंत्र शालेय पोषण आहार तपासणी समिती स्थापन केली असून या समितीत आहारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध

देसाईगंज : पोषण आहाराबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन राज्य शासनाने स्वतंत्र शालेय पोषण आहार तपासणी समिती स्थापन केली असून या समितीत आहारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राहणार आहेत. केंद्र शासनाच्यामार्फतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. या भोजनात वारंवार बदल करण्यात आला. प्रारंभी तांदळापासून तर आता शिजविलेले अन्न देण्यापर्यंतचा पोषण आहाराने प्रवास केला आहे. मागील काही दिवसांपासून पोषण आहारातील निकृष्ट दर्जाबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी कशी केली जाते. हे तपासण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे संयुक्त समिक्षा पथक कार्यरत आहे. आता मात्र राज्याने स्वत:चेच समिक्षा पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकामध्ये आहारतज्ञ, आरोग्य सेवा योजनेतील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षण उपसंचालक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, शालेय पोषण आहार सांभाळणारे अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती सर्वसमावेशक असल्याने शालेय पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे पथक शाळेतील अन्न शिजविणारी यंत्रणा, तांदुळ व धान्यसाठ्याचा दर्जा, आवश्यक भांडी, स्वयंपाक गृहे, मदतनीस, धान्य साठविण्याची जागा तसेच शालेय पोषण आहारासंबंधीचे सर्व अभिलेख तपासणार आहे. शालेय पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आजपर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. मात्र हे प्रयोग अजूनपर्यंत यशस्वी झालेले नाहीत. शालेय पोषण आहाराचा दर्जा सुमार राहत असल्याने अनेक विद्यार्थी सदर पोषण आहार घेत नाही. यामुळे दर्जा सुधारणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)