ऐतिहासिक वैरागड किल्ल्यात पुन्हा गुप्तधनाचा शोध ? खोदकाम केल्याची धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:53 IST2025-12-04T15:51:34+5:302025-12-04T15:53:09+5:30

Gadchiroli : गुप्तधनाच्या लालसेपोटी वैरागड (ता. आरमोरी) किल्ल्याजवळ पुन्हा एकदा अज्ञातांनी खोदकाम केल्याची धक्कादायक घटना ३ डिसेंबर रोजी समोर आली आहे.

Hidden treasure discovered again in the historic Vairagad fort? Shocking incident of excavation | ऐतिहासिक वैरागड किल्ल्यात पुन्हा गुप्तधनाचा शोध ? खोदकाम केल्याची धक्कादायक घटना

Hidden treasure discovered again in the historic Vairagad fort? Shocking incident of excavation

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड (जि. गडचिरोली) :
गुप्तधनाच्या लालसेपोटी वैरागड (ता. आरमोरी) किल्ल्याजवळ पुन्हा एकदा अज्ञातांनी खोदकाम केल्याची धक्कादायक घटना ३ डिसेंबर रोजी समोर आली आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजालगत टोकावरील बुरुजाजवळ चार पाच दिवसांपूर्वी हे खोदकाम झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी मोठ्या चाफ्याच्या झाडाजवळही गुप्तधनाच्या शोधात खोदकाम करण्यात आले होते.

ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या वैरागड परिसरात किल्ला, भंडारेश्वर, गोरजाईसह हेमाडपंती देवळांचा मोठा ठेवा आहे. १२ ते १६ व्या शतकात झालेल्या परकीय आक्रमणांच्या भीतीने तत्कालीन लोकांनी देवालये, घरांच्या आवारात किंवा दगडी संरचनांखाली मौल्यवान नाणी, द्रव्य किंवा दुर्मीळ मूर्ती लपवून ठेवत असत. त्या काळातील अनेक घटनांचा उल्लेख आजही गावात दंतकथास्वरूपात केला जातो. या पार्श्वभूमीवर वैरागड परिसरात अधूनमधून घडणारे खोदकाम थांबण्याचे नाव घेत नाही. काही टोळ्या गुप्तधनाच्या शोधात ऐतिहासिक स्थळांची मोडतोड करीत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.

इतिहासाला तडा... प्रशासन कुठे?

वारंवार खोदकाम केले जात असल्यामुळे ऐतिहासिक वैरागड किल्ला आणि परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचा इतिहासतज्ज्ञांचा दावा आहे. संवर्धनाच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यापूर्वीही धार्मिक स्थळांना लक्ष्य

गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर वसलेल्या भंडारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगही वीस-पंचवीस वर्षापूर्वी गुप्तधनाच्या शोधात उखडण्यात आले होते. बाहेरील आवाज दडवण्यासाठी त्यावेळी भजनाचा कार्यक्रम सुरू असल्याचा आभास निर्माण करून आत खोदकाम झाले होते. याप्रकरणी पोलिसांत तक्रार झाली; परंतु आरोपींचा शोध लागला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी शिवलिंगाची नव्याने प्रतिष्ठापना केली.

मागील दशकांतही अशाच घटना

सन १९८८ मध्ये किल्ल्याच्या मागील दरवाजालगतच्या चिंचेच्या झाडाजवळ मोठे खोदकाम झाले होते. त्याठिकाणी मातीचे मोठे मडके पुरले असल्याच्या खुणा दिसून आल्या होत्या. त्यावेळीही मोठ्या 3 प्रमाणात गुप्तधन चोरून नेल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. पूजाअर्चेच्या नावाखाली बोकडाचे मुंडके ठेवून विधी केल्याची माहितीही समोर आली होती.
 

Web Title : फिर गुप्त धन की तलाश? वैरागढ़ किले में चौंकाने वाली खुदाई

Web Summary : गढ़चिरौली के वैरागढ़ किले के पास अज्ञात लोगों ने गुप्त धन के लालच में खुदाई की। दो साल पहले भी ऐसा ही हुआ था। ग्रामीणों का कहना है कि खजाने के शिकारी ऐतिहासिक स्थलों को नुकसान पहुंचा रहे हैं, किले की विरासत को बचाने के लिए तत्काल कार्रवाई की जाए।

Web Title : Treasure hunt again? Shocking excavation at Vaigarh Fort.

Web Summary : Unidentified individuals dug near Vaigarh Fort, Gadchiroli, driven by greed for hidden treasure. This incident follows a previous excavation two years ago. Locals report historical sites being vandalized by treasure hunters, urging immediate administrative action to preserve the fort's heritage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.