शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राकाँ-आविसंला सोबत घेऊन जि. प.मध्ये सत्ता स्थापन करू

By admin | Updated: March 2, 2017 01:55 IST

भाजप-राकाँ युतीचा जिल्हा परिषदेतील गट कायद्याने नोंदणीकृत होऊ शकत नाही.

विजय वडेट्टीवार यांची माहिती : आघाडीत २५ सदस्य असल्याचा दावा गडचिरोली : भाजप-राकाँ युतीचा जिल्हा परिषदेतील गट कायद्याने नोंदणीकृत होऊ शकत नाही. गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांची ही सत्ता स्थापन करण्याची राजकीय खेळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून काँग्रेस-राकाँ आघाडीची सत्ता गडचिरोली जिल्हा परिषदेवर स्थापन करणार, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधानसभेतील काँगे्रसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, पी. टी. मसराम आदींसह काँग्रेसचे नवनिर्वाचित जि. प. सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना आ. वडेट्टीवार यांनी सांगितले की, भाजप व काँग्रेसचा जि. प. युतीचा अधिकृत गट नाही. काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष मिळून आजघडीस जि. प. तील २५ सदस्य संख्या आहे. केंद्र व राज्यपातळीवरील काँग्रेस व राकाँ पक्षाच्या नेत्यांशी गडचिरोली जि. प. मध्ये आघाडी करण्याबाबत आमची चर्चा झाली आहे. काँग्रेस व राकाँची आघाडी महाराष्ट्रभर होणार असून यासंदर्भातील अधिकृत घोषणा राज्यस्तरावरून होईल, असेही ते म्हणाले. काँग्रेस प्रमाणेच राकाँ धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे जातीयवादी भाजपशी जिल्हा परिषदेत युती करणार नाही, असा आमचा विश्वास आहे. तसेच धर्मरावबाबांनी जातीयवादी पक्षासोबत न जाता समविचारी काँग्रेस पक्षासोबत यावे, असे आवाहन आ. वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेस, राकाँ, आविसं आघाडीची गडचिरोली जि. प. वर सत्ता स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसतर्फे सर्वप्रथम आघाडीचा प्रस्ताव गडचिरोली जि. प. मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राकाँ अशी आघाडी व्हावी, यासंदर्भातील प्रस्ताव काँग्रेसतर्फे आम्ही सर्वप्रथम राकाँचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाब आत्राम यांच्याकडे दिला. काँग्रेस-राकाँ आघाडी होण्यासंदर्भात सुरुवातीपासूनच त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे. तडजोडीची भाषा त्यांच्याशी करण्यात आली आहे. जि.. प. तील भाजप-राकाँ युतीबाबतची भूमिका भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र राकाँकडून यात स्पष्टता नाही. त्यामुळे या युतीवर प्रश्नचिन्ह आहे, असे ते म्हणाले.