शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठा करावा. कुरखेडावरून कोरची येथे येणारी विद्युत लाईन कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला लावावी.

ठळक मुद्देमहाग्रामसभेची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे वर पाण्याची शेती संकटात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय व साधने उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु पावसाच्या पाण्यावर शेती करणारे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाग्रामसभेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठा करावा. कुरखेडावरून कोरची येथे येणारी विद्युत लाईन कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला लावावी. तोपर्यंत देवरीवरून विद्युत पुरवठा करावा, तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करावी, तसेच पाच- पाच पार्इंटचे दोन ट्रान्सफार्मर लावावे. दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने रोजगार हमीची तसेच कुशल, अकुशल कामे मंजूर करावी, तालुक्यातील मसेली, कोटगूल, कोटरा येथे राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा मंजूर कराव्या तसेच कोरची येथे एसबीआयची शाखा उघडावी. तालुक्यात केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. परंतु कव्हरेज वारंवार विस्कळीत होतो. त्यामुळे खासगी कंपन्यांचे टॉवर उभारावे. गावपाड्यांना महसूली गावाचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी, सचिव नरेंद्र सलामे, सहसचिव कुमारी जमकातन, राजाराम नैैताम, कल्पना नैैताम, शीतल नैैताम, सियाराम हलामी, इजामसाय काटेंगे, नंदकिशोर वैरागडे, रूपेश कुमरे, गणेश गावडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली.मागण्यांकडे वेधले लक्षमहाग्रामसभेने केसरी कार्डधारकांना स्वस्त धान्य, शेतकऱ्यांना मोफत वीज, रोहयोतून शेतीची कामे करणे, वनहक्क पट्टे देणे, बोअरवेल देणे, उपजिल्हा रूग्णालय दर्जा व यंत्रसामग्री उपलब्ध करणे आदी मागण्यांकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारagricultureशेती