शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अतिसंवेदनशील मुरंगलमध्ये गुंजला भारत मातेचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST

श्यामराव येरकलवार लाहेरी (गडचिरोली) : एकीकडे २६ जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना गडचिरोलीच्या काही दुर्गम भागात मात्र राष्ट्रीय ...

श्यामराव येरकलवार

लाहेरी (गडचिरोली) : एकीकडे २६ जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना गडचिरोलीच्या काही दुर्गम भागात मात्र राष्ट्रीय सण कोणते आणि ते कशासाठी साजरे केले जातात, याची जाणीवही लोकांना नसते; पण यावेळी पोलिसांच्या पुढाकाराने नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील लाहेरी, मुरंगलसारखा परिसर नेहमीच नक्षल दहशतीत वावरणारा आहे. त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. परिणामी, राष्ट्रीय सणही साजरे होत नाहीत; पण यावेळी त्यांनी इतर भारतीयांप्रमाणे अगदी उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.

नक्षलविरोधी अभियान राबवित असलेल्या पोलीस ठाणे लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर हे आपल्या पोलीस पथकासह मुरंगल येथे आले व त्यांनी गावकऱ्यांना या दिवसाचे महत्त्व सांगत उपस्थित गावकरी, बालकांना मिठाई वाटप केली. सर्वांचे तोंड गोड केल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान फुलले. सर्वांनी 'भारत माता की जय'चे नारे लावत लोकशाही व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी राबविलेल्या या उपक्रमाने आदिवासी बांधव भारावून गेले.

यावेळी सीआरपीएफच्या ३७ बटालियनचे असिस्टंट कमांडंट संतोष भोसले, पीएसआय अजयकुमार राठोड, विजय सपकाळ, हवालदार अरुण टेकाम, नायक यशवंत दाणी, फिरोज गाठले, शिपाई मोहित मानकर, पुरुषोत्तम कुमरे, मालू पुंगाटी, चिरंजीव दुर्गे, सौरव बाळबुध्ये, हमीत डोंगरे, अमित कुलेटी, संदीप आत्राम व सीआरपीएफचे जवान आदी उपस्थित होते.