शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

गिधाड संवर्धन केंद्र ठरणार चार राज्यांसाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:49 IST

चामोर्शी तालुक्यातील गिधाड संवर्धन प्रकल्पाला मंगळवारी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातील ३३ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी भेट देऊन अभ्यास केला.

ठळक मुद्देगिधाड बघून भारावले : ३३ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या चमूची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील गिधाड संवर्धन प्रकल्पाला मंगळवारी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातील ३३ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी भेट देऊन अभ्यास केला. कुनघाडा रै. येथील गिधाड संवर्धनाची पद्धत शास्त्रशुद्ध असल्याने सदर पद्धत त्यांच्या राज्यातही अवलंबून आहे. गिधाडांचे संवर्धन करणार असल्याची माहिती दिली.निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा गिधाड पक्षी हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. मात्र अतिरिक्त जंगलतोड व पाळीव प्राण्यांच्या शरीरात आढळणारे घातक द्रव्य यामुळे गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. गिधाडांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयाने गिधाड संवर्धनासाठी पाऊल उचलले.२००५ पासून कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रात गिधाडांच्या संवर्धनाला सुरुवात झाली. त्यावेळेवर गिधाड शोध मोहीम राबविली. तेव्हा या परिसरात केवळ ३० ते ३५ च्या संख्येने गिधाड आढळून आले. त्यानंतर वन विभागाने गिधाडांच्या संवर्धन केंद्र स्थापन करून गिधाड संवर्धनासाठी उपाययोजना केली. त्यामुळे गिधाडांची संख्या वाढली असून सध्या या परिसरात जवळपास १५० ते २०० च्या जवळपास पोहोचली.राज्यातील हा अभिनव उपक्रम असल्याने इतर राज्यामधील पक्षी प्रेमी तसेच वनविभागाचे अधिकारी या प्रकल्पाला भेट देत आहेत.मंगळवारी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश या चार राज्यातील ३३ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या चमूने भेट दिली. यावेळी तामिळनाडू वनअकादमी कोईमतुरच्या उपसंचालिका प्रियदर्शनी उपस्थित होत्या. या सर्व अधिकाºयांनी गिधाड उपहारगृह, गिधाडांचे वास्तव्य या क्षेत्राला भेट देऊन अभ्यास केला. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाने गिधाड संवर्धनासाठी अवलंबलेली पद्धती आवडल्याने त्यांनी आपल्या राज्यातही याच पद्धतीने गिधाडांचे संवर्धन करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी सहायक उपवनसंरक्षक सोनल भडके, कुनघाडा रै. चे वनपरिक्षेत्राधिकारी जी.एम. घोंगडे, गिधाड संवर्धनाचे केंद्रस्थ अधिकारी मोतीराम चौधरी, क्षेत्रसहायक विशाल सालकर, पुंडलिक भांडेकर, गिधाड मित्र दिनकर दुधबळे उपस्थित होते. अभ्यास दौºयातील टीमला आकाशात उडणाऱ्या गिधाडांचे दर्शन झाल्याने ते भारावून गेले.यशस्वीतेसाठी वनरक्षक भास्कर ढोणे, एम.एन. तलमले, संदीप आंबेडारे, जी.एच. टेकाम, ए.एल. लाकडे, बी.के. शिंदे, साईनाथ टेकाम, वसंत कुनघाडकर, नामदेव कापकर, नंदू वाघाडे, राहुल कापकर, रामचंद्र कुनघाडकर, लालाजी कुनघाडकर यांनी सहकार्य केले.