शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

गडचिराेली : युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या ...

गडचिराेली : युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाभर घेण्यात आला. त्यांच्या विचारकार्यावर प्रकाश टाकून त्यांना अभिवादन करण्यात आले.

नगर परिषद, गडचिराेली : राजमाता जिजाऊंचे आदर्श सर्वांनी आत्मसात करावे तर स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान असून, त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष याेगीता पिपरे यांनी केले. नगर परिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बोलत होत्या. सर्वप्रथम नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला, तर मुख्याधिकारी संजीव ओव्हाड यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, कार्यालयीन अधीक्षक मधुकर कन्नाके, स्नेहल शेंद्रे, बंडू टाकसांडे, नीलेश सोनवणे, गणेश नाईक, गणेश ठाकरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

वीर शिवाजी क्रीडा, कला, सांस्कृतिक मंडळ, घारगाव व नेहरू युवा केंद्र, गडचिराेली : घारगाव येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती वाचनालयाच्या परिसरात साजरी करण्यात आली. युवा दिनानिमित्त गावात युवकांनी स्वच्छता अभियान राबविले. अध्यक्षस्थानी पाेलीसपाटील ठेमाजी आभारे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून देवराव कुकुडकर, बालाजी झोडक, नीलेश ठाकरे, पवन आभारे, मंडळाचे अध्यक्ष अमाेल मंगर, उपाध्यक्ष दीपक आभारे, सचिव आकाश झोडक उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन नितेश शेंडे, दीपक आभारे यांनी, तर आभार विशाल आभारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर भोयर, बाळकृष्ण धोटे, रुपेश गेडाम, शरद मंगर, खिमदेव झोडक, सूरज आभारे, तुकाराम आभारे, विश्वजित आभारे, प्रकाश धानफाेले, सौरभ आभारे, तुषार मंगर, आकाश आभारे, नीरज आभारे, नीलोज धोटे, व्यंकटेश बोरकुटे, लीलनाथ बोरकुटे, प्रवीण भगत, सुलोचना गुरफडे, सानिका आभारे, वेदांती आभारे, वैष्णवी मंगर, दीक्षा भोयर, सोनू आभारे, आकांक्षा भूरकुंडे, चेतना ठाकरे, प्राजक्ता आभारे, तनुश्री मंगर, भैरवी मंगर यांनी सहकार्य केले.

जि. प. हायस्कूल, चामाेर्शी : येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अविनाश तालापल्लीवार, दीपक शिवणकर उपस्थित हाेते. दरम्यान नंदिनी गव्हारे, अश्विनी चिचघरे, दीपाली सातपुते, एकता शेट्टे, शारदा कुमरे यांनी समुहगीत सादर केले. संचालन प्राजक्ता गव्हारे यांनी केले. यशस्वीतेसाठी मुस्कान ठाकरे, काैशिक राॅय, पवन वाघाडे, वैशाली ढाेरे, अमित मुजूमदार, अभिजीत मंडल, चंदन बिश्वास, राेशनी राॅय, प्रतीक खेडेकर, अनिकेत भाेगावार, रामपद सरकार, हर्षा रंधये, संगीता माेटघरे, जगदीश देशमुख, पीयुष आकेवार, दिलीप कुनघाडकर, नेत्रा पाेटवार, अमित भांडेकर यांनी सहकार्य केले.

जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा : येथे स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन तसेच राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. ए. तुंगीडवार होते. प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन

समिती अध्यक्ष प्रभाकर खोबरे, प्रशांत साळवे, रश्मी ढोके, किरण दरडे होते. याप्रसंगी स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार रजनी मडावी यांनी मानले.

मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड तथा संभाजी ब्रिगेड, चामोर्शी : येथे राजमाता जिजामाता यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गाेकुळ झाडे, वंदना म्हस्के, कविता झाडे, कल्पना बहिरेवार, संगीता चौधरी, संध्या चित्तारकर, शीला नाकाडे, संगीता कुनघाडकर, चंद्रकला गोहणे, गीता चौधरी, सुनीता बागडे, प्रा. संजय म्हस्के, दिलीप चित्तारकर, हिराजी गोहणे, ऋषीदेव कुनघाडकर, वामनराव किनेकर उपस्थित हाेते.

श्री तुकाराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कढाेली : येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालय विद्यार्थ्यांची दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एफ. एफ. मेहरे होते. प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम पडोळे, प्रा. प्रदीप बोडणे, प्रा. एस. एम. जुवारे, एम. व्ही. बावनकर उपस्थित होते. दौड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

विद्याभारती हायस्कूल, पुराडा : येथे येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य सी. एल. डाेंगरवार व कर्मचारी उपस्थित हाेते. या निमित्ताने दाैड स्पर्धा व रांगाेळी स्पधार् घेण्यात आली. संचालन एन. बी. मेश्राम यांनी केले.