वाहनाच्या धडकेत ग्रामसेवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:22 IST2018-12-11T00:21:43+5:302018-12-11T00:22:04+5:30
विरूध्द दिशेने येणाऱ्या मालवाहक ट्रकने दुसºया बाजुने येणाºया अज्ञात वाहनाला धडक दिल्याने या अपघातात चारचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कढोली येथे घडली.

वाहनाच्या धडकेत ग्रामसेवक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : विरूध्द दिशेने येणाऱ्या मालवाहक ट्रकने दुसºया बाजुने येणाºया अज्ञात वाहनाला धडक दिल्याने या अपघातात चारचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कढोली येथे घडली.
कुरखेडा तालुक्याच्या घाटी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विलास बावणे हे शासकीय कामानिमित्त घाटीवरून गडचिरोलीकडे जात होते. दरम्यान विरूध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने एमएच ३१ सीपी ५१३२ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. यात चारचाकीस्वारासह वाहन रस्त्याच्या बाजुला फेकल्या गेले. ही घटना कढोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या कार्यालयाजवळ १० डिसेंबर रोजी सोमवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. अपघात होताच त्या स्थळावर नागरिकांनी गर्दी केली. या अपघातातील जखमीला कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. किरकोळ जखम असल्याने अनर्थ टळला. या अपघातातील ट्रक भरधाव वेगाने येत होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात.