शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांबाबत ग्रामपंचायत उदासीन

By admin | Updated: September 24, 2014 23:35 IST

शासनाकडून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीच्या सुमारे तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करावा, असे शासनाचे निर्देश असले तरी हा नियम राज्यातील एकही ग्रामपंचायत पाळत नसल्याचा

वैरागड : शासनाकडून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीच्या सुमारे तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करावा, असे शासनाचे निर्देश असले तरी हा नियम राज्यातील एकही ग्रामपंचायत पाळत नसल्याचा आरोप जनपरिसर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.वैरागड येथील शंकर मंदिर परिसरात अपंग जनकल्याण परिसर संघटनेची सभा सोमवारी पार पडली. याप्रसंगी अपंगांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान अपंग संघटनेचे पांडुरंग अल्बमकर, नानाजी लांजेवार, सारूबाई ढोक, महानंदा मेश्राम, सोमेश्वर मसुले, मीराबाई गेडाम यांच्यासह वैरागड परिसरातील १३ गावातील अपंग जनकल्याण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायत प्रशासनाला दरवर्षी लाखो रूपयांचा निधी प्राप्त होतो. या निधीतून विकासाची कामे करण्याबरोबरच जनतेच्या कल्याणकारक बाबीवरही खर्च करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या एकूण निधीपैकी तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र कोणतीच ग्रामपंचायत एवढा खर्च करत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासाठी आपण लढा देऊ असे सभेमध्ये ठरविण्यात आले. त्याचबरोबर अपंगांना आॅनलाईनद्वारे अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अपंग व्यक्तीला स्वतंत्र रेशनकार्ड देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र धान्याचा पुरवठा शासनाने करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)