शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीश शासनकाळाची साक्ष देतोय सिरोंचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:15 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन पुलांमुळे विकासाला गती येण्याची चिन्हं दिसत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे होते मुख्य केंद्र : दुर्गम भाग मात्र विकासापासून अजूनही वंचितच; सिंचनानंतर शेतीचे क्षेत्र वाढले

कौसर खान।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन पुलांमुळे विकासाला गती येण्याची चिन्हं दिसत आहेत.तत्कालीन चांदा (चंद्रपूर) जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९ हजार ३१२ चौ.किमी एवढे होते. त्यात सिरोंचा व गडचिरोली हे दोन मुख्य तालुके १८८० पर्यंत अस्तित्वात होते. १९०७ मध्ये चांदा जिल्ह्याचे चांदा, वरोडा, ब्रह्मपुरी, गडचिरोली व सिरोंचा या पाच तालुक्यांमध्ये विभाजन करण्यात आले होते. १९५१ मध्ये औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्यात असलेला राजुरा तालुका चांदा जिल्ह्याला जोडण्यात आला. त्यानंतर चांदा जिल्ह्यात सहा तालुके निर्माण झाले. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे या सहा तालुक्यांचे क्षेत्रफळ १९ हजार १२७ चौ.किमी होते. तर लोकसंख्या १२ लाख ३७ हजार ८० एवढी होती. विस्ताराने खूप मोठे तालुके असल्याने १९८० मध्ये या तालुक्यांचे विभाजन करून नवीन १८ तालुके निर्माण करण्यात आले. सिरोंचा तालुक्याची निर्मिती मात्र १८७४ साली ब्रिटीश कालावधीतच झाली. १९०५ मध्ये अहेरी जमिनदारीतील २ हजार ६०३ चौ.मैल क्षेत्र सिरोंचा तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. ब्रिटीशांच्या कालावधीत सिरोंचा हे प्रशासनाचे मुख्य केंद्र होते. गोदावरी, प्राणहिता नदी पार केल्यानंतर पहिले मोठे गाव सिरोंचा हेच पडत असल्याने ब्रिटीशांनीही अनेक वास्तू सिरोंचात उभारून सिरोंचा शहराला आकार देण्याचा प्रयत्न केला.गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सिरोंचा तालुक्याचेही विभाजन करण्यात आले. हळूहळू विकासाला गती मिळाली. सिरोंचा तालुक्याचा परिसर गोदावरीचा खोरा म्हणून ओळखल्या जाते. येथील काळ्या कसदार जमिनीत कोणतेही पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येते. शासनाने सिंचन विहीर, लहान-मोठे तलाव, बोड्यांची निर्मिती केली. त्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. सिरोंचा तालुका प्रामुख्याने कापूस, धान, मिरची, मका व भाजीपाला या पिकांचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे नदीकाठचे शेतकरी बारमाही उत्पादन घेण्यात व्यस्त राहतात.पुलांमुळे विकासाला उभारी येण्याची आशासिरोंचा तालुका गोदावरी नदीने वेढला आहे. हा तालुका जरी गडचिरोली जिल्ह्यात असला तरी येथील संस्कृती, भाषा तेलंगणा राज्याशी बरीच मिळतीजुळती आहे. गोदावरी नदी असल्याने पावसाळ्यात आवागमनास अडचण निर्माण होत होती. नावेने धोकादायक प्रवास करून तेलंगणा गाठावे लागत होते. आता मात्र गोदावरी, प्राणहिता नद्यांवर पुलांचे बांधकाम केले जात आहे. सिरोंचाजवळील पूल बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहतूक सुकर झाली आहे. परिणामी तेलंगणातील नागरिकांसोबत सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे व्यवहार वाढले आहेत.