घर कामगार माेलकरीण यांना सानुग्रह अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST2021-04-14T04:33:20+5:302021-04-14T04:33:20+5:30

तळागाळातील घरेलू कामगार मोलकरीण महिला सकाळपासून मालकाच्या घराची स्वच्छता करतात. त्यांची भांडी धुणे व कपडे धुणे हे अतिशय ...

Give sanugrah grants to house workers | घर कामगार माेलकरीण यांना सानुग्रह अनुदान द्या

घर कामगार माेलकरीण यांना सानुग्रह अनुदान द्या

तळागाळातील घरेलू कामगार मोलकरीण महिला सकाळपासून मालकाच्या घराची स्वच्छता करतात. त्यांची भांडी धुणे व कपडे धुणे हे अतिशय कष्टाचे काम करीत करतात. मात्र त्यांना घरमालकाकडून अत्यंत कमी मजुरी दिली जाते. या मजुरीवर शहरात प्रपंच करणे कठीण हाेते. त्यामुळे त्यांना ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच दरमहा १ हजार रुपये अनुदान देण्याची गरज आहे.

या महिलांसाठी सन्मान योजना सुरू करण्यात आली हाेती. या याेजनेंंतर्गत १० हजार रुपयांचे अनुदान दिले जात हाेते. मात्र मागील सरकारने ही याेजना बंद केली आहे. ही याेजना पुन्हा सुरू करण्यात यावी. कोरोनाकाळात सतत राबविणाऱ्या मोलकरणींना प्रत्येक घरमालकाने मास्क, सॅनिटायझर पुरवण्यास घर मालकांना बाध्य करावे किंवा शासनाने मास्क मोफत पुरवावे, अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.

===Photopath===

130421\13gad_4_13042021_30.jpg

===Caption===

नायब तहसीलदार लाेखंडे यांना निवेदन देताना मानीक तुरे

Web Title: Give sanugrah grants to house workers