बंगाली समाजाला जमिनीचे पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 01:39 IST2017-05-10T01:39:03+5:302017-05-10T01:39:03+5:30
मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली समाजाला अतिक्रमणीत जमिनीचे वनपट्टे देण्यात यावे,

बंगाली समाजाला जमिनीचे पट्टे द्या
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : तीन पिढ्यांची अट रद्द करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली समाजाला अतिक्रमणीत जमिनीचे वनपट्टे देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी नायक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर पूर्व पाकिस्तानमधून भारतात आलेल्या बंगाली समाजाला अतिक्रमीत वनहक्क जमिनीचे पट्टे देणे गरजेचे आहे. मात्र पट्टे देताना तीन पिढ्यांची अट टाकण्यात आली आहे. बंगाली समाज ही अट पूर्ण करू शकत नाही. भारत, पाकिस्तान देशातून मूळ ठिकाणातून विस्थापित झालेल्या व्यक्तीला सहाय्य व पुनर्वसन करावे, असे स्पष्ट निर्देश राज्य घटनेच्या सातव्या सूचितील समवर्ती सूचित क्रमांक २७ मध्ये नमूद करण्यात आले आहे. २००७ च्या वनहक्क नियमात बंगाली समाजाला एका पिढीची अट टाकून पंतप्रधानांनी बंगाली समाजाला जमिनीचे पट्टे द्यावे व बंगाली समाजाला न्याय द्यावा, असे निवेदनातून म्हटले आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक हलदर, पं. स. उपसभापती आकुली बिश्वास, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, मनमोहन बंडावार, दिलीप दास, बिधान बेपारी, प्रवीण सेन, अशोक बिश्वास, गोलप तरकदार, तरूण बाच्छाड, मंडल, सुरेश गुंतीवार उपस्थित होते. बंगाली समाजाला जात प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी मागील ३० वर्षांपासून संघर्ष सुरू ठेवला आहे. अनेकवेळा या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले. मात्र न्याय मिळाला नाही.