शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत मानधन तत्काळ द्या- दहिवडे

By admin | Updated: October 7, 2015 02:31 IST

मागील वर्षीचा थकीत मानधन तत्काळ द्यावे, महिला व बालकल्याण विभागाकडे आहे. या विभागाला दिल्या जाणाऱ्या निधीत शासनाने यावर्षी कपात केली आहे.

मुलचेरा : मागील वर्षीचा थकीत मानधन तत्काळ द्यावे, महिला व बालकल्याण विभागाकडे आहे. या विभागाला दिल्या जाणाऱ्या निधीत शासनाने यावर्षी कपात केली आहे. याचा परिणाम बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर होत आहे. शासनाने या विभागाकडे लक्ष घालून या विभागाच्या निधीत वाढ करावी, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे.अंगणवाडी महिलांचा मेळावा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे विठाबाई मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे बोलत होते. पुढे मार्गदर्शन करताना दहिवडे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन आपली आई धुणीभांडी करीत होते, असे गहिवरून सांगतात. मात्र याच सात वर्षावरील धुणीभांडी करणाऱ्या महिलांकरिता पेंशनची घोषणा का करीत नाही, असा सवाल उपस्थित केला. २६ जानेवारीला १० लाख रूपयांचा कोट घालताना त्यांच्या हाताला थरकाप का सुटला नाही, मोदी हे देशातील नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून बेबी त्रिनगरीवार यांनी हक्काच्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. मेळावा यशस्वीतेसाठी सिंधू पेंदोर, मलीना बाला, ज्योत्स्ना समजदार, योगीता गुरनुले, बेबी शेडमाके, सुनीता पंधरे, चंद्रकला सिडाम, लीला गलबले, भारती मालाकार यांनी सहकार्य केले.