शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

४५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप

By admin | Updated: December 25, 2016 01:48 IST

प्रशासन आपल्या दारी, जागर शासकीय योजनांचा महाराजस्व अभियानांतर्गत कासवी येथे विस्तारीत समाधान शिबिर शुक्रवारी पार पडले.

कासवीत समाधान शिबिर : धनादेश व विविध प्रकारच्या दाखले प्रदान जोगीसाखरा : प्रशासन आपल्या दारी, जागर शासकीय योजनांचा महाराजस्व अभियानांतर्गत कासवी येथे विस्तारीत समाधान शिबिर शुक्रवारी पार पडले. या शिबिरात पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत ४५ लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले. तसेच शौचालय बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेश आणि नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न व सातबारा आदी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे तर अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक रनजीत पाटील, जि.प. सदस्य लक्ष्मी मने, पं.स. सभापती सविता भोयर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई, डॉ. प्रिया गेडाम, प्राचार्य लालसिंग खालसा, नामदेव सोरते, सरपंच पुष्पलता तिवाडे, शशिकांत गेडाम, प्रा. ठाकरे, विजय गोरडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी महसूल, कृषी, पंचायत समिती, आरोग्य वन, रेशीम उद्योग, कृषी उत्पन्न बाजार समिती, पशुवैद्यकीय विभाग आदींच्या वतीने स्टॉल लावून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी तहसीलदार वलथरे, संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, संचालन प्रा. विजय रेवतकर, प्रा. लोमेश मेश्राम यांनी केले तर आभार शशिकांत गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न.पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या रासेयोचे स्वयंसेवक, प्रा. तसेच मानवी हक्क समिती दत्तक ग्राम समिती व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)