शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान व घनकचरा जळीत प्रकरण थंडबस्त्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

वडसा रोडलगतच्या या जैवविविधता उद्यानात चार- पाच वर्षांपूर्वी विविध जातींची दुर्मीळ वनौषधींची झाडे, बांबू, फळे व फुलांची झाडे आणि बगिचा लावण्यात आला होता. हे उद्यान तयार करताना शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र, अलीकडच्या काळात सदर उद्यानाचे काम रखडले होते,  उद्यानाची  देखभाल करणे गरजेचे होते; परंतु आरमोरी वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. चौकीदार ठेवले असते, तर उद्यानाला आग लावण्याची हिंमत कुणी केली नसती आणि शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले नसते.

ठळक मुद्दे१५ दिवसांचा कालावधी उलटला, रहस्य कायम, दाेषींवर कारवाईची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील वडसा मार्गावरील वन विभागाच्या जैवविविधता उद्यान व नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला धूलिवंदनाच्या दिवशी आग लागली होती. या आगीत उद्यानातील दुर्मीळ आणि मौल्यवान वनौषधींची झाडे व बगीचा जळाला, तसेच कचरा डेपोतील  प्लास्टिक कचऱ्याचे ढीग जळून खाक झाले. मात्र, या प्रकरणाची चौकशी अजूनही थंडबस्त्यात आहे.सदर आग ही मानवनिर्मित असून, ती अज्ञात इसमाने लावलेली असल्याचा संशय संबंधित विभागाला आहे. आग लागण्यामागे कुणाचा हात आहे व आग लावण्याचा हेतू काय? याचा शोध संबंधित विभागाने अद्याप घेतला नाही. त्यामुळे जळीत प्रकरणातील आरोपीचा सुगावा अजून लागलेला नाही. वन विभाग व नगर परिषद प्रशासनाने याबाबत कुठलीच कार्यवाही केली नाही. १५ दिवसांचा कालावधी लोटूनही जळीत प्रकरणामागील रहस्य उलगडलेले नाही.  वडसा रोडलगतच्या या जैवविविधता उद्यानात चार- पाच वर्षांपूर्वी विविध जातींची दुर्मीळ वनौषधींची झाडे, बांबू, फळे व फुलांची झाडे आणि बगिचा लावण्यात आला होता. हे उद्यान तयार करताना शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र, अलीकडच्या काळात सदर उद्यानाचे काम रखडले होते,  उद्यानाची  देखभाल करणे गरजेचे होते; परंतु आरमोरी वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. चौकीदार ठेवले असते, तर उद्यानाला आग लावण्याची हिंमत कुणी केली नसती आणि शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले नसते. मौल्यवान वनसंपदाही जळून खाक झाली नसती; परंतु सदर बाबीकडे अधिकाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही. आरमोरी- वडसा रस्त्यालगत जैवविविधता उद्यानाच्या जवळ नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे. याही केंद्राला एकाच वेळी आग लावण्यात आली. यामध्ये तेथील प्लास्टिकचा कचरा जळून खाक झाला. सदर कचरा डेपोत ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण झाले होते. तिथे पाण्याची व्यवस्था होती काय? तिथे कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रकल्प असल्याने कुणी चौकीदार होते का, आदी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  जैवविविधता उद्यान व घनकचरा डेपोला आग लागल्याच्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होत आहे. मात्र, आग लावणारा अज्ञात इसम अद्यापही सापडला नाही. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोन्ही घटनांतील आरोपींचा शोध लावण्यात यावा,  अशी मागणी होत आहे. याबाबत आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी या प्रकरणाची चाैकशी सुरू असून अद्याप आराेपीचा शाेध लागला नसल्याचे सांगितले. न.प.चे अभियंता नितीन गाैरखेडे यांनी पाेलिसांनी तक्रार नाेंदवून घेतली नसल्याचे सांगितले. 

या प्रकरणाची तक्रार एका कर्मचाऱ्यामार्फत आरमाेरी पाेलीस स्टेशनला दिली हाेती. साेबत घटनास्थळाचा पंचनामाही जाेडला हाेता. पण पाेलिसांनी तक्रार दाखल करून न घेता अधिक माहिती मागितली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारीची प्रत दिली आहे.   -माधुरी सलामे,मुख्याधिकारी, न.प.आरमाेरी

तक्रार परिपूर्ण नव्हतीयासंदर्भात पाेलीस स्टेशनला विचारले असता, नगर परिषदेकडून आलेली तक्रार परिपूर्ण नव्हती. त्यामुळे त्यात आवश्यक असलेली माहिती नमूद करून तक्रार पाठविण्याची सूचना करण्यात आली. परंतु नंतर नगर परिषदेकडून तक्रार किंवा माहिती पाेलीस स्टेशनकडे पाठविण्यात आली नसल्याचे ठाण्यातून सांगण्यात आले.

 

टॅग्स :fireआगforest departmentवनविभाग