शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काेरचीतील कचराकुंड्या ठरल्या निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST

काेरची : स्वच्छ सर्वेक्षण २०२० या कार्यक्रमांतर्गत नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी लाखाे रुपये खर्च करून २५ कचराकुंड्यांची ...

काेरची : स्वच्छ सर्वेक्षण २०२० या कार्यक्रमांतर्गत नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी लाखाे रुपये खर्च करून २५ कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात आली; मात्र या कचराकुंड्या अल्पावधीतच तुटफुट झाल्याने या कचराकुंड्या निकामी ठरल्या आहेत. या कामाची चाैकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मनाेज अग्रवाल यांनी केली आहे.

एक वर्षापूर्वी कोरची शहरात नगरपंचायततर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत २५ ठिकाणी कचराकुंड्या लावण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी एक ओला कचरा व सुका कचरा अशा दोन कुंड्या लावण्यात आल्या. त्याकरिता लाखो रुपये खर्चसुद्धा करण्यात आले. परंतु एका वर्षातच ही कचराकुंडीच निकामी ठरली. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत अनेक भिंती रंगविण्यात आल्या. त्याकरिता निधी खर्च करण्यात आले. परंतु आज या भिंतीलाच स्वच्छतेची गरज असल्याचे जाणवत आहे. लावण्यात आलेल्या कचराकुंड्यांमुळे सफाई कामगारांचा सुद्धा ताण कमी होत होता. कारण परिसरातील नागरिक कचराकुंडीत कचरा टाकायचे त्यामुळे परिसर स्वच्छ राहत हाेता. कचराकुंडी ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे एक वर्षसुद्धा टिकू शकली नाही.

कचराकुंडी नसल्यामुळे बाहेरुन आलेले नागरिक हे कचरा रस्त्यावर टाकून देतात. त्याकरिता सफाई कामगारांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत असून, याच कचऱ्यावर परिसरातील पाळीव जनावरे ताव मारत असतात. त्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या संपूर्ण निधीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक मनोज अग्रवाल यांनी केली आहे.