शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या ग्रामीण भागातही भाजपची मुसंडी

By admin | Updated: October 21, 2014 22:51 IST

विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. पक्षाचाही एकही जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यात

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. पक्षाचाही एकही जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यात नसतांना भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात मारलेली मुसंडी निश्चितच मोठी आहे. भाजपच्या खालोखाल काँग्रेस पक्षानेही गडचिरोलीच्या ग्रामीण भागात चांगले मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे गडचिरोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांसाठी आता ही मताधिक्य दोन वर्षानंतर धोक्याची घंटा वाजविण्याची शक्यता आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे कोटगल-मुरखळा जि. प. क्षेत्राचे सदस्य केसरी पाटील उसेंडी हे स्वत: शिवसेनेकडून मैदानात असतांनाही त्यांच्या क्षेत्रात शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. गडचिरोली तालुक्यात कोटगल-मुरखळा, वसा-पोर्ला, जेप्रा-विहिरगाव, मौशिखांब-मुरमाडी, येवली-पोटेगाव हे पाच जिल्हा परिषद क्षेत्र आहे. यातील दोन क्षेत्रांमध्ये काँग्रेस, दोन क्षेत्रामध्ये अपक्ष तर एका क्षेत्रात युवाशक्ती आघाडीच्या बॅनरवर निवडून आलेल्या महिला सदस्य जि. प. मध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. कोटगल-मुरखळा क्षेत्रात भाजपला ३ हजार २०६, राष्ट्रवादी काँग्रेसला १ हजार २८२, शिवसेनेला १ हजार २१४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ५५९ तर बहुजन समाज पक्षाला १ हजार ८२ मते मिळाली. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती असलेले विश्वास भोवते यांच्या वसा-पोर्ला क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ८०६ मते मिळाली. भाजपला ३ हजार ५८०, शिवसेनेला १ हजार २६, काँग्रेसला ६३७ व बहुजन समाज पार्टीला ८०८ मते मिळाली. जेप्रा-विहिरगाव जि. प. क्षेत्रात भारतीय जनता पार्टीला २ हजार ७२१, राष्ट्रवादी काँग्रेसला ६५८, शिवसेनेला ५२४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १ हजार ५० तर बहुजन समाज पार्टीला ८४२ मते मिळाली. मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पार्टीला ३ हजार ८९९, राष्ट्रवादी काँग्रेसला १ हजार १४४, शिवसेनेला ७७३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ९९५ तर बहुजन समाज पार्टीला ५९५ मते मिळाली. येवली-पोटेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ३ हजार ९७०, राष्ट्रवादी काँग्रेसला ६५५, शिवसेनेला १ हजार ६३०, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ९२७ तर बहुजन समाज पार्टीला ९०८ मते मिळाली. (शहर प्रतिनिधी)