शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीला वेग

By admin | Updated: June 17, 2016 01:22 IST

गडचिरोलीचे नगराध्यक्ष पद सध्या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार

इच्छुकांची संख्या वाढणार : भाजपमध्येही मोठी घडामोड होण्याची शक्यतागडचिरोली : गडचिरोलीचे नगराध्यक्ष पद सध्या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असल्याने नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी स्नेहमिलन कार्यक्रम व वाढदिवसाचे सोहळे साजरे होत आहे. गडचिरोली नगर परिषदेवर सध्या अपक्ष आघाडीचे (युवाशक्ती) साम्राज्य आहे. मागील पाच वर्षांच्या काळात ठेकेदारीशिवाय नगरसेवकांनी कोणतेही विकास काम केलेले नाही. गडचिरोली शहराच्या विकासाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ केला आहे. राष्ट्रीय महामार्ग मंजूर असणाऱ्या भागात विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. या कामावर झालेला खर्च महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर पाण्यात जाणार आहे. केवळ सरकारी निधीची उधळपट्टी या पदाधिकाऱ्यांनी करून शहर विकासाचा बोजवारा उडविलेला आहे. या सर्वपक्षीय नगरसेवक तेवढेच कारणीभूत आहेत. त्यामुळे या प्रचंड नाराजीच्या वातावरणात यावेळची नगरपालिका निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, सुधाकर येनगंधलवार हे दोघे चर्चेत आहेत. मात्र या दोन्ही नावांना संघाचा विरोध असल्याचे समजते. संघाच्या वतीने एका बड्या व्यक्तीच्या नावाला पाठींबा दर्शविण्यात आला आहे. सध्या सदर व्यक्ती भाजपात नसली तरी पक्षाचे हित लक्षात घेऊन व नगरपालिकेत सत्ता बसविण्यासाठी यांनाच उमेदवारी द्या, असे साकडे संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी पक्षाच्या नागपूर येथील वरिष्ठ नेत्यांकडे घातले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून जिल्हा महासचिव नरेंद्र भरडकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय युवाशक्ती आघाडीच्या एका नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिल्या जाणार असल्याची चर्चा जोरात पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, अरूण हरडे यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपने पिपरे व येनगंधलवार यांच्या व्यतिरिक्त उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस हरडे यांना उमेदवार करू शकते, असे राजकीय जाणकार मानतात. याशिवाय तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते अतुल गण्यारपवार यांनीही गडचिरोली शहरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह संपूर्ण पॅनल मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या वतीने विद्यमान न.प. शिक्षण सभापती विजय गोरडवार, अ‍ॅड. संजय ठाकरे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. आपली आघाडी मैदानात नक्की उतरणार असल्याचे गण्यारपवार यांनी स्पष्ट केले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरून चर्चा जोरात आहे.(जिल्हा प्रतिनिधी)