शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली पं. स. ची आमसभा ठरली वादळी

By admin | Updated: March 6, 2016 00:56 IST

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा पं. स. च्या परिसरात शनिवारी पार पडली.

कामाची गती वाढवा : घरकूल, रोहयोची थकीत मजुरी, पाणी योजना, विद्युतीकरण मुद्दे गाजलेगडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा पं. स. च्या परिसरात शनिवारी पार पडली. घरकुलाचे प्रलंबित प्रस्ताव, रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी, बंद स्थितीत असलेल्या पाणीपुरवठा योजना, रखडलेले विद्युतीकरण, प्रलंबित वनहक्क पट्ट्याचे प्रस्ताव आदींसह विविध मुद्यांवर सदर सभा प्रचंड वादळी ठरली. विशेष म्हणजे या सभेत अनेक सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेचा लेटलतीफपणा व गैरव्यवहाराचा आमदारांपुढे पाढा वाचला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाची गती वाढवावी, असे निर्देश आ. डॉ. होळी यांनी यावेळी दिले. या वार्षिक आढावा सभेला मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पं. स. चे सभापती देवेंद्र भांडेकर, उपसभापती किशोर गद्देकार, जि. प. सदस्य छाया कुंभारे, जगन्नाथ बोरकुटे, प्रशांत वाघरे, पं. स. सदस्य सविता कावळे, बांबोळे, संवर्ग विकास अधिकारी विजय पचारे, तहसीलदार डी. भोयर आदी उपस्थित होते. या सभेत वाकडी ग्रा. पं. चे सरपंच बोरकुटे यांनी वन विभागाच्या १९ हेक्टर जागेवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. वन विभाग तसेच भूमीअभिलेख विभागाने येथे असलेल्या वन तलावाच्या जागेचे सिमांकन केले नाही. परिणामी वनहक्काच्या नावाखाली मसेलीच्या नागरिकांनी अतिक्रमण केले, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वनहक्क पट्ट्याचा प्रस्ताव सादर करून ते मंजूर करून घेतले. त्यामुळे वाकडी गावासाठी गायरानची जागा उरली नाही, शेतकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा नाही, असे सांगितले. यावर सदर समस्येकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वाकडीवासीयांना न्याय देण्याचे निर्देश आमदारांनी दिले. इंदिरा आवास योजनेंतर्गत वाकडी गावात ११० घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र पाच घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. सदर घरकूल कुठे गेले, असा प्रश्न सरपंच बोरकुटे यांनी उपस्थित करून आमदारांचे लक्ष वेधले. कोटगल गावात १२ वीज खांब मंजूर करण्यात आले. मात्र ते अद्यापही लावण्यात आले नाही, असा मुद्दा कोटगलच्या सरपंचांनी उपस्थित केला. कोटगलची पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे, असेही सरपंचांनी यावेळी सांगितले. जुन्या कंत्राटदारावर कारवाई करून नवीन कंत्राटदारांकडून तत्काळ पाणी योजनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देश आमदार डॉ. होळी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. येवली गावात एकूण २८३ घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र पहिल्या हप्त्याचे अनुदान न मिळाल्यामुळे ११६ घरकुलांचे काम थांबले आहे, असा मुद्दा तेथील सरपंचांनी सभेत मांडला. यावर बीडीओ पचारे यांनी आॅनलाईन प्रक्रिया असून शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम दिली जात आहे. यात तांत्रिक अडचणी आहेत, असे सांगितले. या सभेत सिंचन, आरोग्य, शिक्षण, बांधकाम आदी विषयावरील मुद्दे गाजले. सभेचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)