वॉटर स्पोर्टस स्पर्धेत गडचिरोली पोलिसांची 'सुवर्ण'भरारी

By संजय तिपाले | Updated: March 5, 2024 18:11 IST2024-03-05T18:11:31+5:302024-03-05T18:11:54+5:30

उपनिरीक्षक संतोष कडाळे यांची कामगिरी: २३ व्या अखिल भारतीय स्पर्धेत यशाला गवसणी

Gadchiroli Police won 'gold' in water sports competition | वॉटर स्पोर्टस स्पर्धेत गडचिरोली पोलिसांची 'सुवर्ण'भरारी

वॉटर स्पोर्टस स्पर्धेत गडचिरोली पोलिसांची 'सुवर्ण'भरारी

गडचिरोली:  माओवाददृष्टया अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील उपनिरीक्षक संतोष कडाळे यांनी २३ व्या अखिल भारतीय पोलिस वॉटर स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

जम्मू - काश्मीर पोलिसांच्या पुढाकाराने श्रीनगर येथे २३ वी अखिल भारतीय पोलिस वॉटर स्पर्धा २ ते ८ मार्च दरम्यान पार पडत आहे. या स्पर्धेत आरमोरी पोलिस ठाण्यात कार्यरत  उपनिरीक्षक संतोष कडाळे यांनी अतिशय थंड (-१°ते -४°) इतक्या कमी तापमानात अतिशय कमी ऑक्सिजन मध्ये खेळल्या जाणाऱ्­या Coxless Four 1000 मीटर या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र पोलिस संघाचे नेतृत्व करत सुवर्ण पदक प्राप्त केले. याबद्दल उपनिरीक्षक संतोष कडाळे यांचे नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल,

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर अधीक्षक एम. रमेश यांनी स्वागत केले आहे.

Web Title: Gadchiroli Police won 'gold' in water sports competition