शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली विभागात एसटीचे ३० कोटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

काही मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत, मात्र त्यांच्यामध्ये केवळ ३० ते ४० टक्के भारमान मिळत आहे. परिणामी एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. सामान्य परिस्थितीत गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी आगार मिळून एसटीला दरदिवशी ३ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र लॉकडाऊनपासून या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला सुरूवात होऊन अडीच महिने झाले, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने एसटीच्या अजूनही मोजक्याच फेऱ्या धावत आहेत. त्यामुळे दिवसागणिक एसटीच्या तोट्यात भर पडत आहे. गडचिरोली विभागांतर्गत येणाºया गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या तीन बस आगारात तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.२२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तेव्हापासून ३ मे पर्यंत बससेवा पूर्णपणे बंद होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार ४ मे पासून गडचिरोली जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र अजुनही बसला प्रवासी मिळत नसल्याने बहुतांश मार्गांवरील बसफेऱ्या बंदच आहेत.काही मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत, मात्र त्यांच्यामध्ये केवळ ३० ते ४० टक्के भारमान मिळत आहे. परिणामी एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सोडल्या जात आहेत.सामान्य परिस्थितीत गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी आगार मिळून एसटीला दरदिवशी ३ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र लॉकडाऊनपासून या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.मार्च महिन्यात ३ कोटी ७ लाख, एप्रिल महिन्यात १० कोटी ५१ लाख, मे महिन्यात ८ कोटी ३४ लाख, जून महिन्यात ७ कोटी ७५ लाख असे एकूण २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र बसेस बंद असल्याने हे उत्पन्न आले नाही.३ कोटी रुपयांची उधारीगडचिरोली विभागातील ३ आगारांमध्ये महिन्याला १० कोटींचे उत्पन्न बुडत असताना दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च मात्र सुरूच आहे. त्यामुळे एसटीचा तोटा गंभीर स्वरूप धारण करीत आहे. ३ कोटी १० लाख रुपयांची उधारी शिल्लक आहे. यामध्ये डिझेलचे ६१ लाख, एलआयसीचे २४ लाख, एसटी बँकचे १ कोटी १२ लाख आदींचा समावेश आहे. व्यवहार सुरू होऊन एसटीला प्रवासी मिळेल तेव्हाच परिस्थिती सुधारू शकते.

टॅग्स :state transportएसटी