गडचिरोलीत अपघात; मुलगा जागीच ठार, आई-वडील जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:05 IST2018-04-25T21:05:16+5:302018-04-25T21:05:22+5:30
कुरखेडा तालुक्यातील पुराडा-मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भरधाव कारची झाडाला जबरदस्त धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले.

गडचिरोलीत अपघात; मुलगा जागीच ठार, आई-वडील जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील पुराडा-मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भरधाव कारची झाडाला जबरदस्त धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले. मृतकांमध्ये मुलाचा तर जखमींमध्ये त्याच्या आई-वडिलांचा समावेश आहे.
नक्ष जितेंद्र भरणे या चार वर्षीय मुलाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर विद्या व जितेंद्र भरणे हे पतीपत्नी जखमी झाले. सुदैवाने सोबत असलेला दीड वर्षाचा चिमुकला जखमी झाला नाही. मालेवाडा येथील जितेंद्र भरणे हे कुटुंबासह गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे बुधवारी नातेवाईकांकडे असलेल्या लग्न समारंभासाठी स्वत:च्या कारने जात होते. दरम्यान रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. जखमींवर पुराडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.