शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२०० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

By admin | Updated: September 17, 2014 23:48 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील मल्लेर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने बंद केली आहे.

अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील मल्लेर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने बंद केली आहे. यामुळे या आश्रमशाळेत शिकणाऱ्या २०० च्यावर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. सदर आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी आदिवासी विकास प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असून या आश्रमशाळेत लोहारा परिसरातील १० ते १५ गावातील २०० च्यावर आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत होते. आदिवासी विकास विभागाच्या अहेरी प्रकल्प कार्यालयातर्फे या आश्रमशाळेची तपासणी करण्यात आली. या आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतच्या वर्गाची पटसंख्या कमी आढळल्यामुळे या आश्रमशाळेतील १ ते ४ वर्ग बंद करण्यात आले. त्यानंतर या आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा प्रस्ताव अहेरीच्या प्रकल्प कार्यालयाने शासनाकडे पाठविला. त्यानंतर शासनाच्या मंजुरीनंतर आदिवासी विकास विभागाने लोहाराची आश्रमशाळा पूर्णपणे बंद केली. विशेष म्हणजे इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतची विद्यार्थी संख्या पुरेशी असतांना सर्वच वर्ग बंद करण्याचा चुकीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याचा आरोप पालकांनी निवेदनातून केला आहे. लोहारानजीकच्या १० ते १५ गावांपैकी एकाही गावात इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नाही, त्यामुळे या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील दाखल विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येऊ नये, लोहाराची आश्रमशाळा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला आहे. अहेरीच्या प्रकल्प कार्यालयाने लोहाराची आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र लोहाराची आश्रमशाळा अद्यापही सुरू झाली नाही. अर्धे अधिक शैक्षणिक सत्र संपत आले आहे. आश्रमशाळा सुरू झाली नाही. त्यामुळे या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)