शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

कडवी डावी विचारसरणीच्या ठिकाणी केंद्राकडून निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:46 IST

गडचिरोलीला ३० कोटी; पायाभूत विकासासाठी विशेष साहाय्य निधी

- जमीर काझी मुंबई : डाव्या कडव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यातील मूलभूत व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय गृहविभागाने आता पुढाकार घेतला आहे. येथील विकासासाठी भरघोस निधी दिला जात असून, महाराष्टÑात गडचिरोली जिल्ह्याला या योजनेंतर्गत ३० कोटी मिळाले आहेत.केंद्राकडून आलेल्या निधीच्या वितरणासाठीच्या प्रस्तावाला गृहविभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यातून स्थानिक स्तरावर विविध विकास कामे केली जाणार आहेत. दुसऱ्या टप्पयात २१.६६ कोटी दिले जाणार आहेत, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.पावणेदोन वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे भीषण जातीय हिंसाचार झाला होता. त्यापूर्वी पुण्यात शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेतील चिथवणीखोर भाषणे कारणीभूत असल्याचा आणि हा सर्व कट डावी कट्टर विचारसरणी मानणारे नेते व नक्षलवादी चळवळीतून केला जात आहे, असा निष्कर्ष तपास यंत्रणाकडून काढण्यात आला. त्यानंतर, पुणे-मुंबईसह देशभरातील विविध ठिकाणांहून डावी विचारसरणी असलेले नेते, चळवळीतील कार्यकर्ते आणि विचारवंतावर कारवाई करण्यात आली. त्याबाबत सरकारच्या भूमिकेविषयी आरोप-प्रत्यरोप झाले असून, उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.दरम्यान, डावी कट्टर विचारसरणी असलेले, देशात विद्रोही शक्तीला, नक्षली कारवाईला प्रोत्साहन देत आहेत, त्यांच्यामुळे ग्रामीण नागरिकांमध्ये सरकारविरोधात द्वेष निर्माण केला जात आहे, असे केंद्रीय गृहविभागाच्या अहवालात नमूद केले आहे, त्यामुळे त्याला प्रतिबंधासाठी अशा भागात विशेष केंद्रीय साहाय्य देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत एकूण ५१.६६ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६० टक्के रक्कम म्हणजे ३० कोटी मंजूर झाले आहेत. उर्वरित ४० टक्के रक्कम आर्थिक वर्षाअखेरपर्यंत वितरित केली जाईल.निधीचा असा होणार वापरडाव्या कट्टर विचारसरणीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात विकासाबरोबरच पोलीस व सुरक्षा यंत्रणांसाठीआवश्यक सामग्री दिली जाईल, तसेच गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक सुविधांसाठी हा सर्व निधी केंद्राने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खर्च करायचा आहे, तसेच ग्रामीण तरुण, तरुणी नक्षली चळवळीच्या प्रभावात येऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने खबरदारी घ्यायची आहे. शिक्षणाचा प्रसार, गावागावात शाळा, महाविद्यालयाची उभारायची आहेत.