साेमवारी चार काेराेनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:35 IST2021-04-13T04:35:10+5:302021-04-13T04:35:10+5:30

साेमवारी झालेल्या चारजणांच्या मृत्यूमध्ये आरमाेरी तालुक्यातील ३७ वर्षीय पुरुष, धानाेरा तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील एक महिला, भंडारा ...

Four carnage victims died on Friday | साेमवारी चार काेराेनाबाधितांचा मृत्यू

साेमवारी चार काेराेनाबाधितांचा मृत्यू

साेमवारी झालेल्या चारजणांच्या मृत्यूमध्ये आरमाेरी तालुक्यातील ३७ वर्षीय पुरुष, धानाेरा तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील एक महिला, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील एका ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

एकूण बाधितांची संख्या १२ हजार ५८३ एवढी झाली आहे. १० हजार ७४८ जणांनी काेराेनावर मात केली आहे; तर सध्या १ हजार ६९८ जणांवर उपचार सुरू आहेत. १३७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.४२ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १३.४९ टक्के, तर मृत्यूदर १.०९ टक्के झाला.

नवीन १८७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९३, अहेरी तालुक्यातील ३, आरमोरी १७, भामरागड ५, चामोर्शी तालुक्यातील २९, धानोरा १३, एटापल्ली २, कोरची १, कुरखेडा १४, मुलचेरा तालुक्यातील १, सिरोंचा तालुक्यातील ३, तर देसाईगंज तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ६१ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ३६, अहेरी ११, आरमोरी १, आरमोरी ४, भामरागड २, चामोर्शी ३, धानोरा ६, एटापल्ली ३, कुरखेडा २ तसेच देसाईगंज तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे.

Web Title: Four carnage victims died on Friday