शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गावडेंच्या प्रचारार्थ आंध्रच्या माजी मंत्र्यांची पदयात्रा

By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST

अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे यांच्या प्रचारार्थ सिरोंचा येथे शनिवारी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आंध्र प्रदेशचे माजी मंत्री तथा सध्याच्या तेलंगणाचे काँग्रेस

सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे यांच्या प्रचारार्थ सिरोंचा येथे शनिवारी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आंध्र प्रदेशचे माजी मंत्री तथा सध्याच्या तेलंगणाचे काँग्रेस नेते विनोद गड्डम सहभागी झाले होते. सिरोंचा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेत काँग्रेस उमेदवार मुक्तेश्वर गावडे, तालुकाध्यक्ष अब्दुल रहिम सहभागी झाले होते. यावेळी शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. आंध्रचे माजी मंत्री विनोद गड्डम यांच्या कुटुंबियांचे सिरोंचा शहराशी जवळचे नाते आहे. गड्डम यांचे भाऊ माजी खासदार डॉ. गणेश व त्यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री व्यंकटेश्वरूलू यांचेही सिरोंचा तालुक्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यामुळे या तालुक्यात या कुटुंबियांचा प्रभावही आहे. त्यामुळे विनोद गड्डम यांच्या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला फायदा होईल, असे वर्तविले जात आहे. विनोद गड्डम यांच्या पदयात्रेमुळे सिरोंचा येथील कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा संचारली आहे. पदयात्रेपूर्वी विनोद गड्डम यांनी सिरोंचा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत जातीयवादी पक्षांना निवडणुकीत रोखायचे असेल तर काँग्रेसला विजयी करावे, याकरिता कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन विनोद गड्डम यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सिरोंचाच्या पं. स. सभापती लालुबाई मडावी यांचा विनोद गड्डम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तेलंगणाचे काँग्रेस नेते कर्णास्वरराव, राजा गौडा, लक्ष्मी राजा गौडा, अहेरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब अली, श्रीनिवास गन्नू, शहराध्यक्ष बशीरोद्दीन, ग्रा. पं. सदस्य रवी सल्लमवार, श्याम बेझनवार, व्यंकटेश चिलमकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)