‎समोर वनविभागाचे 'बचाव' धडे, ‎मागे बिबट्याने केला तरुणावर हल्ला !

By संजय तिपाले | Updated: February 25, 2026 15:21 IST2026-02-25T15:19:29+5:302026-02-25T15:21:24+5:30

Gadchiroli : एकीकडे वनविभाग बिबट्यापासून बचावाचे धडे देण्यासाठी गावात जनजागृतीपर चित्रफीत दाखवत असतानाच, दुसरीकडे त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातल्याची थरारक घटना

Forest Department's 'rescue' lessons in front, leopard attacks young man in the back! | ‎समोर वनविभागाचे 'बचाव' धडे, ‎मागे बिबट्याने केला तरुणावर हल्ला !

Forest Department's 'rescue' lessons in front, leopard attacks young man in the back!

गडचिरोली : एकीकडे वनविभागबिबट्यापासून बचावाचे धडे देण्यासाठी गावात जनजागृतीपर चित्रफीत दाखवत असतानाच, दुसरीकडे त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातल्याची थरारक घटना धमदीटोला (ता. कुरखेडा) येथे २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली. या हल्ल्यात सदानंद धरमदास उईके (३२) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.

‎धमदीटोला परिसरात मागील आठवडाभरापासून  एका नरभक्षक  बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावकऱ्यांमधील भीती दूर करण्यासाठी  रात्री वनविभागाचे पथक गावात चित्रफीत दाखवत होते. 'बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा' याचे मार्गदर्शन सुरू असतानाच, सदानंद उईके हा तरुण लघुशंकेसाठी घराच्या मागील बाजूस गेला. तिथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट सदानंदच्या अंगावर झडप घेतली. त्याने आरडाओरड केली. त्यानंतर आवाज ऐकताच चित्रफीत पाहणारे नागरिक आणि वनकर्मचारी धावत सुटले. लोकांचा गराडा पाहताच बिबट्याने तिथून धूम ठोकली, ज्यामुळे सदानंदचा जीव थोडक्यात वाचला. त्याला तातडीने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

​पाच दिवसात तिसऱ्यांदा हल्ला 

‎​या बिबट्याने परिसरात दहशत निर्माण केली आहे. यापूर्वी मका पिकात लपलेल्या बिबट्याला हाकलून लावताना दोन तरुण जखमी झाले होते. तसेच, सदानंद उईके आणि अन्य एका शेतकऱ्याच्या वासरालाही बिबट्याने फस्त केले आहे. रक्ताची चटक लागलेला हा बिबट्या आता थेट वस्तीत शिरत असल्याने गावकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.

​नेत्यांची धाव, वनविभागाला धारेवर धरले

आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी पं.स. सभापती गिरीधर तितराम आणि माजी पं.स. सदस्य धरमदास उईके यांनी जखमीची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड यांच्याशी संपर्क साधून संताप व्यक्त केला. ​नरभक्षक बिबट्याला तातडीने पिंजऱ्यात जेरबंद करा, ​जखमींना आणि पशुपालक शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या, ​या अशी मागणी करण्यात आली.

​दहशतीचे सावट!

‎रात्री आणि पहाटे घराबाहेर पडणे आता मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. वनविभागाची गस्त सुरू असली तरी बिबट्या वारंवार गावात शिरत असल्याने वनविभाग फक्त चित्रफिती दाखवणार की बिबट्याला जेरबंद करणार? असा संतप्त सवाल धमदीटोलावासीय विचारत आहेत.

Web Title : गढ़चिरोली: वन विभाग के जागरूकता कार्यक्रम के दौरान तेंदुए का युवक पर हमला।

Web Summary : गढ़चिरोली के धमदीटोला में वन विभाग के तेंदुए से सुरक्षा जागरूकता कार्यक्रम के दौरान एक तेंदुए ने युवक पर हमला कर दिया। युवक गंभीर रूप से घायल है। पांच दिनों में यह तीसरा हमला है, जिससे ग्रामीणों में आक्रोश है।

Web Title : Gadchiroli: Leopard attacks youth during forest dept's awareness program.

Web Summary : A leopard attacked a youth in Dhamditola, Gadchiroli, even as the forest department conducted an awareness program on leopard safety. The victim is seriously injured. This is the third attack in five days, sparking outrage among villagers.