शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

रहस्यमय हत्येने हादरला फुले वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 5:00 AM

४ वर्षापूर्वी लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी नगर परिषदेची निवडणूकही लढली होती; पण त्यांचा पराभव झाला. त्यांनी पार्टनरशिपमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्याकडे पैसेही राहात होते. दरम्यान, बुधवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे भावाच्या घरून आलेले जेवण घेतले. सकाळी त्यांच्या घराचे दार उघडे होते, पण ते बाहेर आले नाहीत. आत जाऊन पाहिले असता, ते बेडवर मृतावस्थेत पडले होते. त्यांच्या पोटावर, मानेजवळ जखमा होत्या. तिक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर वार केले असण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देअविवाहित पुरुषाची घरातच हत्या, सामाजिक कार्यामुळे सर्वांशी सलोख्याचे संबंध

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहराच्या उत्तर टोकावरील फुले वॉर्डात एका सामाजिक कार्यकर्त्याची अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने हत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण फुले आणि सर्वोदय वॉर्ड हादरून गेला. दुर्योधन रायपुरे (वय ४८) असे मृताचे  नाव आहे. त्यांची हत्या कोणी आणि कशामुळे केली याचे रहस्य उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.मृत रायपुरे हे अविवाहित होते. गजबजलेल्या फुले वाॅर्डात ते आपल्या वडिलोपार्जित घरात एकटेच राहात होते. त्यांच्या घराला लागूनच त्यांच्या भावाचे घर आहे. तेथूनच त्यांना दररोज जेवण दिले जात होते. समाजकार्याची त्यांना आवड असल्याने कोणाच्याही कामासाठी ते धावून जात होते. ४ वर्षापूर्वी लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी नगर परिषदेची निवडणूकही लढली होती; पण त्यांचा पराभव झाला. त्यांनी पार्टनरशिपमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्याकडे पैसेही राहात होते. दरम्यान, बुधवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे भावाच्या घरून आलेले जेवण घेतले. सकाळी त्यांच्या घराचे दार उघडे होते, पण ते बाहेर आले नाहीत. आत जाऊन पाहिले असता, ते बेडवर मृतावस्थेत पडले होते. त्यांच्या पोटावर, मानेजवळ जखमा होत्या. तिक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर वार केले असण्याची शक्यता आहे. 

दोन्ही श्वानांनी  दाखवला एकच मार्गरायपुरे यांच्या घरात एक काठी, रूमाल आणि अनोळखी चप्पल आढळली. त्याआधारे विशेष प्रशिक्षित श्वानपथकाने आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला. एका श्वानाने आरमोरी मार्गाकडील शेतापर्यंतचा रस्ता दाखवला. त्या ठिकाणी तो श्वान घुटमळला. त्यानंतर दुसऱ्या श्वानाच्या माध्यमातून माग घेतला असता, त्यानेही  तोच मार्ग दाखवला. त्यामुळे आरोपी तेथून एखाद्या वाहनाने पसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाेलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

- या घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ प्रणिल गिल्डा, ठाणेदार प्रमोद बानबले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि तपासासाठी दिशानिर्देश दिले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी घटनास्थळाच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. - गडचिरोली शहरात नागरी वसाहतीत खुनासारख्या घटना क्वचितच घडतात. त्यातच या खुनाच्या घटनेत कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा सहज लक्षात येणारे कारण नसल्यामुळे या खुनाचे रहस्य उघडकीस आणणे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. या घटनेचा तपास एपीआय शरद मेश्राम करीत आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी