शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्वजाराेहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या सचिव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. दरम्यान, संविधानाच्या ...

स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा

रेखेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या सचिव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. दरम्यान, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष गाेवर्धन चव्हाण, विलास सातपुते, माराेती महा, आराेग्यसेवक कर्णासे, पत्रकार महादेव निकाेडे, प्राचार्य उत्तम धाेटे, मुख्याध्यापक जे. एस. चव्हाण उपस्थित हाेते. प्राचार्य ढाेके यांनी तंबाखूमुक्तीची शपथ देऊन परिसर तंबाखमुक्त ठेवण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन किशाेर वावरे, तर राजेश नाकाडे यांनी आभार मानले.

महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय

नवेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष कविता दाेनाडकर, सचिव सदाशिव दाेनाडकर, संस्था सदस्य प्रभाकर दाेनाडकर व कर्मचारी उपस्थित हाेते. मुख्याध्यापक सुषमा बेदरे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर तंबामुक्तीची शपथ घेण्यात आली. ए. आर. मदनकर यांनी आभार मानले.

पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल

आरमाेरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे संचालक केशवन कवंडर, मुख्याध्यापिका सुजाता मेहर, उपमुख्याध्यापिका यशाेदा डाखाेरे, नितुराणी मालाकर उपस्थित हाेते. यावेळी तनीषा घाेडाम, निकिता कुलसंगे, पल्लवी मट्टामी यांनी देशभक्ती गीत गायन केले. सूत्रसंचालन प्रशांत कत्रे तर सिंधू म्हशाखेत्री यांनी आभार मानले.

शंकरराव मल्लेलवार हायस्कूल, बाेदली : प्रजासत्ताक दिनानिमित्त सेमाना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बंडाेपंत मल्लेलवार यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी प्राचार्य मनीष शेटे व शिक्षक उपस्थित हाेते.

सीआरपीएफ १९२ बटालीयन,

गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त पाेलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी द्वितीय कमान अधिकारी दीपक साहू, सुमित कुमार, उपकमांडंट प्रवीण त्रिपाठी, संध्या राणी, सहायक कमांडंट हबीबुल्हा, चिकित्सा अधिकारी डाॅ. रवीकुमार दिहाडे उपस्थित हाेते.

राजर्षी स्कॉलर अकॅडमी

नवेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापिका रंजना चांदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सूत्रसंचालन सचिन झिलपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा धकाते, मोनी बोकडे, अस्मिता खोब्रागडे, प्रतीक्षा वाघमारे, स्नेहा मोहुर्ले, दर्शना अलाम, मंजूषा गजभिये यांनी सहकार्य केले.

मातोश्री कौशल्याबाई बोगावार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नवेगाव मुरखळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रा. संतोष सुरपाम यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी प्रा. विश्वरत्न मेश्राम, प्रा. अविनाश उराडे, संजीत बोरकर, डॉ. विशाल काटकर, वर्षा काटकर, गोपाल पुण्यमवार, प्रशांत मेश्राम, संगीता मारगोणी, सुहास तांमरे, क्षितीज सोनटक्के, नितेश नागापुरे, मयुर कावळे, सतीश नागापुरे, हरीष ठाकरे उपस्थित हाेते.