शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शाेध घेता यावा यासाठी पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातात.  परीक्षा शुल्क कमी राहते. शाळेचे मुख्याध्यापकच परीक्षेचा अर्ज भरून देतात. तसेच गावाजवळच्या शाळेतच परीक्षा केंद्र राहते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात.

ठळक मुद्दे१० एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. यापूर्वी ही परीक्षा २५ एप्रिल राेजी घेण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. मात्र राज्यभरात वाढत असलेले काेराेनाचे रूग्ण लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता २३ मे राेजी घेतली जाणार आहे.प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शाेध घेता यावा यासाठी पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातात.  परीक्षा शुल्क कमी राहते. शाळेचे मुख्याध्यापकच परीक्षेचा अर्ज भरून देतात. तसेच गावाजवळच्या शाळेतच परीक्षा केंद्र राहते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात. जिल्हाभरातील जवळपास पाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. ही परीक्षा २५ एप्रिल राेजी निश्चित करण्यात आली हाेती. मात्र काेराेनाचे रूग्ण वाढत असल्याने आताच परीक्षा घेणे धाेक्याचे ठरू शकते ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा २३ मे राेजी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुन्हा काही दिवसांचा कालावधी मिळणार आहे. १० एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. 

अभ्यास करण्यास मिळाला महिनामहिनाभराने शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करण्यासाठी महिनाभराचा कालावधी मिळाला आहे. शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी केवळ शिष्यव्त्तीचा अभ्यास करतील.

काेराेनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा

सध्या राज्यात काेराेनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. काेराेनाची लाट आता काही दिवस पुन्हा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ मे राेजी परीक्षा हाेणार आहे. ताेपर्यंत काेराेनाची काय स्थिती राहते. त्यावरून पुन्हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी परीक्षा देतात. वयाने हे विद्यार्थी लहान आहेत. परीक्षा केंद्रांवर गर्दी हाेणार नाही. याची खबरदारी घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे.  परीक्षा पास हाेण्यासाठी प्रत्येक विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.मात्र केवळ परीक्षा पास झाला तर शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यासाठी प्राविण्यप्राप्त गुण मिळवावे लागतात. प्राविण्यप्राप्त  विद्यार्थ्याला दरमहा जवळपास १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती