शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मार्कंडा पर्यटन विकासासाठी पाच कोटींच्या कामाचे नियोजन

By admin | Updated: June 6, 2016 02:16 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव पर्यटनस्थळाच्या विकासासाठी प्रदीर्घ काळापासून होत

चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव पर्यटनस्थळाच्या विकासासाठी प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी आता मार्गी लागली आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने पाच कोटी रूपये मार्र्कंडा पर्यटन विकासासाठी मंजूर केले आहे. यापैकी काही रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाली असून या विभागाने मार्र्कंडा पर्यटन विकासाचा आराखडा तयार केला आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गावळ यांच्यासह मार्र्कंडा येथे जागेची पाहणी करून प्रत्यक्ष कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. आमदार डॉ. देवराव होळी व उपअभियंता गावळ यांनी दिलेल्या नियोजन आराखड्याची माहिती दिली. तसेच त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मार्र्कंडा येथे बायपासची गरज असून बायपाससाठी गावकऱ्यांचा आग्रह व शेतीमालकाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याची तयारी दिसून येत असल्याने ‘त्या’ संभावित बायपास मार्गाची पाहणी आमदार डॉ. देवराव होळी व उपअभियंता गावळ यांनी केली आहे. नदीघाटावर पायऱ्यांची गरज लक्षात घेऊन नदी घाट विकासाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्ट व नागरिकांनी केली आहे. आमदार डॉ. होळी यांच्या प्रयत्नाने शासनाने पाच कोटी रूपये मार्र्कंडा विकासासाठी दिले. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभाग तातडीने कामाला लागले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.पुरातत्व विभागाने देखील मार्र्कंडा विकासाची दखल घेतली असल्याने मार्र्कंडा तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाहणीदरम्यान आ. डॉ. देवराव होळी, तहसीलदार यु. जी. वैद्य, उपअभियंता गावळ, सरपंच ललिता मरस्कोल्हे, उपसरपंच सेविकांत आभारे, ग्रा.पं. सदस्य खुशाल कुळसंगे, यु. एन. जुनघरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, मनोज पालारपवार, प्रशांत एगलोपवार, दिलीप चलाख, माणिक कोहळे, नरेंद्र अलसावार, जयराम चलाख, ग्रामसेवक सराटे आदीसह नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)अशा होतील सुविधा४मार्र्कंडा येथे पोचमार्गावर ८६ लाख, टॅक्सी पार्किंग व सुविधा बांधकामासाठी ३२ लाख, रिसोर्ट कॉटेज इमारत ९९.१९ लाख, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी ९.९५ लाख, निरीक्षण मनोरा बांधकाम ४१.५४ लाख, सुलभ शौचालय १९.९० लाख, जाहिरात पोर्टल, गेट सुरक्षा बांधकामासाठी ८.६७ लाख, भूमिगत गटार व फूटपाथसाठी ९७ लाख, पाण्यातील खेळ व नौकाविहार १.६० लाख, नदी किनारा विकासकामांसाठी ९९.५७ लाख व इतर कामांसाठी पाच लाख असे एकूण ४९५.३६ लाखाच्या कामांचे नियोजन करण्यात आले.