अपघातात पाच वऱ्हाडी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:13 IST2018-05-07T00:13:25+5:302018-05-07T00:13:25+5:30
रानडुकरांच्या कळपाला वाचविताना वऱ्हाडी वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. यामध्ये पाच वऱ्हाडी जखमी झाले. तर एक रानडुकर वाहनात सापडून ठार झाला. सदर घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावर कसारी फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली.

अपघातात पाच वऱ्हाडी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : रानडुकरांच्या कळपाला वाचविताना वऱ्हाडी वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. यामध्ये पाच वऱ्हाडी जखमी झाले. तर एक रानडुकर वाहनात सापडून ठार झाला. सदर घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावर कसारी फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली.
देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील वरात गोंदिया जिल्ह्यातील राजोली भरनोली येथे जात होती. दरम्यान कसारी गावाजवळ रानडुकरांचा कळप रस्ता ओलांडताना अचानक वाहनासमोर आला. रानडुकरांना वाचविण्यासाठी वाहकाने जोरात बे्रक दाबले. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकले. या अपघातात वाहनातील पाच वऱ्हाडी जखमी झाले. जखमींमध्ये निखील राऊत (१६), सुरेश कोल्हे (३५), रूपेश राऊत (१७), अमिता सहारे (१५), दादाजी टिकले (५८) यांचा समावेश आहे. सर्व जखमी कोकडी येथील रहिवाशी आहेत. त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचार झाल्यानंतर त्यांना इतर रूग्णालयात हलविण्यात आले. या वाहनात १० पेक्षा अधिक वऱ्हाडी बसले होते. या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले.