शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

चामोर्शी : कोरोना काळात पालक, विद्यार्थी हतबल असतानाच यावर्षी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून तालुक्याच्या लखमापूर बाेरी येथील शाळेच्या ...

चामोर्शी : कोरोना काळात पालक, विद्यार्थी हतबल असतानाच यावर्षी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून तालुक्याच्या लखमापूर बाेरी येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी परीक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अधिक पैशाची वसुली करून आर्थिक लूट केल्याची तक्रार शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर शाळेला भेट दिली.लखामापूर बोरी येथील भगवंतराव हायस्कूलमध्ये दहावी व बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा फीच्या नावाखाली नियमबाह्यरित्या जादाची परीक्षा फी तेथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतल्याची तक्रार तेथील विद्यार्थ्यांनी व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षांनी जि.प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे ५ जानेवारीला दाखल केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेत खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावली १९८१ मधील तरतुदींनुसार प्रशासकीय कार्यवाही का करण्यात येऊ नये? या बाबतचा खुलासा पुराव्यासह सदर शाळेच्या मुख्याध्यपकांना ११ जानेवारी २०२१ पर्यंत मागविला आहे. ९ जानेवारीला माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर.पी. निकम यांनी सदरच्या प्रकरणात चौकशीसाठी भगवंतराव हायस्कूल येथे भेट देऊन दहावी, बारावीच्या विद्यार्थ्याचे लेखी बयान घेतल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली असून शाळेकडून विद्यार्थ्यांना जादा घेतलेली फी परत दिल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

यासंदर्भात मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, दोन वर्षांपासून वेतनेत्तर अनुदान बंद आहे. विद्यार्थांचे परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी इंटरनेट अडचणीमुळे बरेचदा तालुका किंवा जिल्हा मुख्यालयी जावे लागत होते तसेच इतर खर्च देखील येत होता. कोरोना काळात शाळा आपल्या दारी अंतर्गत गावात भिंती रंगविण्याचा खर्च येत होता. हा खर्च भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संमतीने १०० रुपये अधिकचे घेतले होते. परंतू काहींनी तक्रार करताच ते पैसे परत केले, असे सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.

काेट

सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहावी व बारावी बोर्डाने ठरवून दिलेल्या शुल्काचा तपशील शाळेच्या फलकावर विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून द्यावा. शिक्षक परिषद शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सोबतच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी संघटना प्रयत्नशील आहे.

संताेष सुरावार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद गडचिराेली

विद्यार्थ्याच्या व शिक्षक परिषदेच्या तक्रारीनुसार ९ जानेवारीला शाळेला भेट देऊन विद्यार्थ्याचे बयान घेतले असून जादा घेतलेली फी विद्यार्थ्यांना परत करावयास लावली. याप्रकरणी संबधित मुख्याध्यापकावर नियमानुसार योग्य कार्यवाही करण्यास संस्थेला कळविण्यात येईल.

आर.पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी गडचिराेली