धन्नूरच्या आपद्ग्रस्त महिलेला शासनाकडून आर्थिक मदत

By Admin | Updated: September 5, 2016 01:37 IST2016-09-05T01:37:48+5:302016-09-05T01:37:48+5:30

तालुक्यातील धन्नूर येथील सपना राजू मडावी ही महिला आपल्या नऊ महिन्याच्या मुलीसोबत घरी परत येत असताना वीज पडून जखमी झाली होती.

Financial Assistance from Government for the distressed woman of Dhanur | धन्नूरच्या आपद्ग्रस्त महिलेला शासनाकडून आर्थिक मदत

धन्नूरच्या आपद्ग्रस्त महिलेला शासनाकडून आर्थिक मदत

मुलचेरा : तालुक्यातील धन्नूर येथील सपना राजू मडावी ही महिला आपल्या नऊ महिन्याच्या मुलीसोबत घरी परत येत असताना वीज पडून जखमी झाली होती. या महिलेला शनिवारी मुलचेराचे तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांनी धन्नूर येथील महिलेला १७ हजार ५०० रूपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली.
यावेळी नायब तहसीलदार समशेर पठाण, लगामचे तलाठी रितेश चिंदमवार, तलाठी अनिता दुर्गे, लिपीक जल्लेवार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. रक्कमेचा चांगला उपयोग करावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले. शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्याने मडावी कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. यासाठी तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Financial Assistance from Government for the distressed woman of Dhanur