शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चिंतलपेठ येथे शौचालय बांधकामाला मंजुरी

By admin | Updated: June 28, 2015 02:07 IST

तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ गावात २२ जून रोजी सोमवारी शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन प्रविण दुर्गे या चार वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

पंचायत समिती प्रशासन लागले कामाला : ई-मस्टर काढण्याचे काम युध्दपातळीवर अहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ गावात २२ जून रोजी सोमवारी शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन प्रविण दुर्गे या चार वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान गावातील नागरिकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने गतीने हालचाली वाढवून २४ जूनला बुधवारी चिंतलपेठ येथील शौचालयाला मनरेगा योजनेंतर्गत मंजुरी प्रदान केली आहे. पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनामुळे बांधकाम झाल्यानंतर शासनाच्या योजनेतून शौचालय बांधकामाला अनुदान मिळेल, या आशेवर चिंतलपेठ गावातील तब्बल ८२ कुटुंबांनी शौचालय बांधकामासाठी खड्ड्याचे खोदकाम सुरू केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतरही शासनाकडून पहिल्या टप्प्यातील अनुदान नागरिकांना मिळाले नाही. दरम्यान शासनाच्या शौचालय बांधकामासंदर्भातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत निर्मल भारत व मनरेगा या दोन योजना वेगळ्या झाल्या. त्यामुळे शौचालय बांधकामासाठी खोदलेले खड्डे अनुदानाअभावी तसेच कायम राहिले. त्यामुळे चिंतलपेठ गावात चार वर्षीय बालकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पंचायत समिती प्रशासन शौचालय योजनेच्या कामाला लागले. शौचालय बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ई-मस्टर काढण्याचे काम पं.स. मार्फत युध्दपातळीवर सुरू आहे. येत्या आठ दिवसात शौचालय बांधकामाकरिता लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम अग्रीम म्हणून देण्यात येणार असल्याचे आश्वासन अहेरी पंचायती समितीचे संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांनी ग्रामस्थांना दिले आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने नयनचा घातअहेरी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने चिंतलपेठ या गावात नरेगा अंतर्गत शौचालय बांधकाम मंजूर केले नाही. दरम्यान पं.स.च्या काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार चिंतलपेठ गावात हागणदारी मुक्तीची संकल्पना मांडली व गावकऱ्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त केले. त्यानुसार या गावात शौचालय बांधकामासाठी तब्बल ८२ खड्डे खोदण्यात आले. पाऊस झाल्यानंतर शौचालयाच्या खड्ड्यात पाणी साचले. दरम्यान शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन दुर्गे या बालकाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी घाईने केलेल्या समुपदेशनाने नयनचा घात झाला, अशी भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.