शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी लढतीत अपक्षांनी वाढविली डोकेदुखी

By admin | Updated: October 7, 2014 23:34 IST

आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही हे निवडणुकीदरम्यान सिध्द झाले आहे़ मतदारांच्या पसंतीला उतरण्यासाठी विकासकामांची सरबत्ती

देसाईगंज : आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही हे निवडणुकीदरम्यान सिध्द झाले आहे़ मतदारांच्या पसंतीला उतरण्यासाठी विकासकामांची सरबत्ती हा एकमेव उपाय असल्याचे वारंवार निवडणुकीमध्ये मतदारांनी उमेदवारांना मतदानाच्या माध्यमातून सांगितले आहे. कधी शिवसेना तर कधी काँग्रेस पक्षानी या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे़ मात्र आजपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी सातत्याने १० वर्षापेक्षा जास्त काळ या विधानसभेची खुर्ची सांभाळलेली नाही़ आघाडी व युतीच्या तुटण्यामुळे सर्व राजकीय पक्षासाठी ही निवडणूक अस्मितेची झाली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत चुरस वाढलेली आहे़ मागील विधानसभेच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत नवीन नोंद झालेल्या ३२ हजार ९६१ मतदारांचा कौल कोणाच्या बाजुने राहणार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे़ मागील निवडणुकीमध्ये आनंदराव गेडाम यांना सुरेन्द्र चंदेल याच्याकडून ५ हजार ५५५ मतांचा निसटता विजय मिळविता आला. मात्र या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. त्यात अपक्षांची बाजूदेखील भक्कम असल्यामुळे उमेदवारांची दमछाक उडणार आहे़मागील कित्येक वर्षाची असलेली सेना- भाजपाची युती तुटल्यामुळे आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील भाजपागटात वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे़ आजपर्यंत विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपागटात निरव शांतता पसरलेली दिसत होती,़ मात्र युती तुटताच भाजपाने अगदी नवखा उमेदवार उभा करून उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे़ पाच महिन्याआधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देसाईगंजमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा केवळ १२०० मते अधिक मिळाले होते़ यावरून शहरात काँग्रेस पक्षाची मते सुद्धा भाजप इतकीच आहेत, हे सिद्ध झाले आहे़ तालुक्यात काँगे्रस पक्षाकडे सध्या कार्यकत्यांचा दुष्काळ पडलेला असल्याचे चित्र दिसत आहे़ निष्ठावंतानी तटस्थतेचे हत्यार घेतल्यामुळे आनंदराव गेडामांना ‘एकला चलो रे’ ची भूमिका घ्यावी लागली आहे़ स्वत:ला काँग्रेसचे निष्ठावंत म्हणविणारे कार्यकर्तेसुध्दा दुसऱ्यागटात जाऊन बसले असल्याचे चित्र दिसून येत आहे़ या मतदार संघात बीएसपीला जाणाऱ्या मतदानाची संख्यादेखील अधिक आहे़ मागील निवडणुकीत सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यामुळे गेडाम यांना निसटता विजय मिळविता आला़ या निवडणुकीत यांचे बंधू जयेंद्रसिंग चंदेल उभे आहेत. कुरखेडा, कोरची , मालेवाडा या भागात चंदेल गट सक्रिय आहे़ यापूर्वी नंदकुमार नरोटे यांनी प्रत्येक निवडणुकीत स्वत:चा वेगळा मतदार तयार केला आहे़ शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेतच़ राष्ट्रवादी पक्षालादेखील आरमोरीमध्ये चांगले मताधिक्य मिळू शकते़ वेळोवेळी मोर्चे काढून सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी भाकपानेसुद्धा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे़ या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या मतांचे विभाजन होणार असल्याचे निश्चित झाले आहे़ मागील विधानसभेत आनंदराव गेडाम यांना ४१ हजार २५७ चा मताधिक्य प्राप्त झाले होते़ या निवडणुकीतदेखील ४० हजार मत मिळविणाऱ्या उमेदवाराचाही विजय होऊ शकतो.़ यासाठीच प्रत्येक पक्षानी जात पुढाऱ्यांना हाताशी घेऊन विजयरथात बसण्याची स्वप्ने पाहणे सुरू केली आहेत़ आरमोरीच्या वाड्याचे ज्याच्या डोक्यावर वरदहस्त राहील तो या रथात विराजमान होईल असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे. (वार्ताहर)