शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमीन मेडिगड्डाच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमोबदला देण्याची मागणी : पिकांसह जमीन खरडून जात असल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामुळे आसरअल्ली, अंकिसा, गुमलकोंडा परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन खरडून जात आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान होत आहे.मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून जात आहे, अशा शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्याची मागणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम यांनी केली आहे.धरणापासून १० ते १५ किमी अंतरावरील शेतकºयांना याचा फटका बसत आहे. अंकिसा परिसरातील नडीकुडा, कोतापल्ली, चिंत्तारवेला, अंकिसा, लक्ष्मीदेवीपेठा, गेर्रापल्ली, बोराईगुडम, आसरअल्ली, सुनकरअल्ली, टेकडामोटला, गुमलकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे म्हणून घोषित करावी. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी समय्या तोरकर, सडवली गुडूरी, दामोधर सिपीडी, पापया पाले, धर्मया कोठारी, नारायण पाले, जयराम चौधरी या शेतकºयांनी केली आहे.संबंधित शेतकºयांना मोबदला न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. महाराष्टÑ शासनाच्या सहमतीने तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर धरण बांधले आहे. या धरणामुळे जे काही नुकसान होणार आहे, त्यासाठी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याची जबाबदारी महाराष्टÑ शासनाची आहे. शेतकºयांच्या मागणीला तेलंगणा सरकार भीक घालणार नाही. त्यामुळे महाराष्टÑ शासनाने मध्यस्ती करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Damधरणagricultureशेती