शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अधिकच्या वीज बिलाने शेतकरी चक्रावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज बिल पाठविले जात हाेते. तीन महिन्यांचे वीज सरासरी दाेन हजार रुपये राहत हाेते.

ठळक मुद्देकाेंढाळातील शेतकऱ्यांना महावितरणचा शाॅक : अनेकांना ३० हजार रुपयांपेक्षा जास्त बिल

  नितेश पाटील लाेकमत न्यूज नेटवर्ककुरूड : देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कृषिपम्पाचे वार्षिक वीज बिल ३० हजार रुपयांपेक्षा अधिकचे पाठविले आहे. एवढे माेेठे वीज बिल बघून शेतकऱ्यांना धक्काच पाेहाेचला आहे. काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज बिल पाठविले जात हाेते. तीन महिन्यांचे वीज सरासरी दाेन हजार रुपये राहत हाेते. मात्र महावितरणने २०२० या वर्षात एकदाही शेतकऱ्यांना बिल पाठविले नाही. नाेव्हेंबर महिन्यात अनेक शेतकऱ्यांना वर्षभराचे वीज बिल मिळाले आहे. हे वीज बिल ३० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात आलेले वीज बिल बघून शेतकरी थक्क झाले आहेत.दाेन महिन्यांपूर्वी वैनगंगेच्या पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यामुळे वीज मीटर बंद पडून वीज पुरवठा खंडीत झाला हाेता. तेव्हापासून शेतकऱ्यांनी माेटारपंपाचा वापर सुद्धा केला नाही. तरीही सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचे वार्षिक निव्वळ उत्पन्न ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत अधिकचे वीज बिल पाठविले असल्याने वीज बिल भरावे, कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काेंढाळा येथील शेतकरी सायत्राबाई वाढई यांना २९ हजार ३४० रुपये, दत्तू तुपट यांना ३३ हजार १२० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. अचानक एवढ्या माेठ्याप्रमाणात आलेले वीज बिल बघून वाढई आश्चर्यचकीत झाले आहेत.  

अंदाजाने पाठविले बिल

दाेन महिन्यांपूर्वी वैनगंगा नदीला पूर आला या पुरात अनेक शेतकऱ्यांच्या वीज मीटरमध्ये पाणी शिरून वीज मीटर बंद पडले. हे मीटर अजूनही बंदच आहेत. असे असतानाही सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. यावरून महावितरणने अंदाजे वीज बिल पाठविल्याचे स्पष्ट हाेत आहे. या अंदाजीत बिलांचा माेठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन वीज मीटरची पाहणी करूनच वीज बिल पाठविणे आवश्यक आहे. मात्र महावितरणचे कर्मचारी शेतात न जाताच वीज बिल पाठवित आहेत.

आपल्या तीन महिन्यांचे सरासरी दाेन हजार रुपये बिल पाठविले जात हाेते. विजेच्या वापराएवढेच हे बिल असल्याने भरण्यात काेणतीही अडचण जात नव्हती. मात्र महावितरणने अचानक ३३ हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. एवढे माेठे विज बिल भरणे शक्य नाही. महावितरणचे कर्मचारी शेतांवर न जाताच अंदाजे वीज बिल पाठवितात. याची झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागते. - दत्तू तुपट, शेतकरी, काेंढाळा

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज