शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांसाठी शेतकऱ्यांच्या उड्या

By admin | Updated: June 22, 2016 00:47 IST

१३ वने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मार्फतीने शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिली जातात.

२५ लाखांची तरतूद : १३ वने योजनेत मागणीच्या तुलनेत कमी बियाणांचा पुरवठागडचिरोली : १३ वने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मार्फतीने शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी केवळ १ हजार ३२८ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत बियाणांचा पुरवठा अत्यंत नगन्य असल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे अनुदानित बियाण्यांचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.१३ वने महसुलांतर्गत जिल्हा परिषदेला महसूल प्राप्त होते. या महसुलापैकी काही महसूल शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणांचे वाटप करण्यासाठी वापरल्या जातो. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. यापैकी सुमारे दीड लाख हेक्टरवर धान पिकाची रोवणी केली जाते. त्यासाठी जवळपास २५ हजार क्विंटल धानाचे बियाणे आवश्यक आहे. बहुतांश शेतकरी आता घरचे बियाणे वापरण्याऐवजी खासगी कंपन्यांकडील किंवा महाबिजचे बियाणे वापरतात. मात्र या बियाणांची किमत मोठ्या प्रमाणात राहते. ३० किलोच्या धानाच्या बिजाईसाठी ७०० ते एक हजार रूपये मापावे लागतात. परिणामी सर्वच शेतकरी बियाणे खरेदी करू शकत नाही. जिल्हा परिषदेने यावर्षी अनुदानित बियाण्यांसाठी केवळ २५ लाख रूपयांची तरतूद केली होती. या तरतुदीतून १४९ क्विंटल सोयाबिन, १ हजार ३२८ क्विंटल धान व २२ क्विंटल तुरीचे बियाणे उपलब्ध करून दिले. मागणीच्या तुलनेत बियाणे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे अनुदानित बियाण्यांसाठी पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांच्या उड्या पडत आहेत. बियाणे प्राप्त होताच ते खरेदीसाठी शेतकऱ्यांची रांग लागली आहे. जिल्हा परिषदेने बियाण्यांसाठी अधिकची तरतूद करून किमान पाच हजार क्विंटल तरी बियाणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेने किमान पुढील वर्षी बियाण्यांसाठी अधिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)जास्त तरतुदीची गरजअनुदानावरील बियाण्यांसाठी जिल्हा परिषदेने २५ लाख रूपयांची तरतूद केली आहे. मात्र जिल्ह्यातील क्षेत्र लक्षात घेता ही तरतूद अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने यावरील तरतूद वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे अनुदानित बियाण्यांचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जातो. हे शेतकरी खासगी दुकानातून महागडे बियाणे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे अनुदान वाढविणे गरजेचे आहे.