शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: June 7, 2015 01:59 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून या शासनाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

किसन नागदेवे यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे जनकल्याण पर्व कार्यक्रम
देसाईगंज : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून या शासनाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केले आहे.
देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवारी जनकल्याण पर्व व महासंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, नाना नाकाडे, चांगदेव फाये, नगराध्यक्ष श्याम उईके, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, शालू दंडवते, आशा राऊत, शांताबाई तितीरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी ग्राम पंचायत निवडणुकीत विजय संपाद करणाऱ्या सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना किसन नागदेवे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. राज्य मार्गाचे अनेक काम प्रस्तावित केले आहेत. युरिया खतावरील दरवाढ कपात केल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर आहे. घरकूल योजना, जन-धन योजना, बेटी सुरक्षा योजना अशा अनेक योजना कार्यान्वित करून जनतेला विकासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
जनतेने भाजपावर विश्वास ठेवत केंद्रात व राज्यातील सत्ता हाती दिली आहे. या विश्वाला तडा जाऊ न देता सरकारने अनेक विकासात्मक काम केले आहे. हे सर्व कामे व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांचे काम असल्याचे प्रतिपादन केले. संचालन राजरतन मेश्राम यांनी केले.