शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या दस्तावेजांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: June 20, 2016 01:08 IST

पंचायत समितीमधील जुने दस्तावेज वेळोवेळी झेरॉक्स काढण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे यातील बहुतांश दस्तावेजांची पाने फाटली आहेत.

एटापल्ली पंचायत समितीमधील स्थिती : प्रमाणपत्रांसाठी जुने पुरावे म्हणून होतो उपयोगरवी रामगुंडेवार एटापल्लीपंचायत समितीमधील जुने दस्तावेज वेळोवेळी झेरॉक्स काढण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे यातील बहुतांश दस्तावेजांची पाने फाटली आहेत. अनेक दस्तावेज शेवटच्या घटका मोजत आहेत. या दस्तावेजांची वेळीच देखभाल न केल्यास ते पूर्णपणे फाटून त्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.इंग्रजांच्या काळात गावातील कोतवाल गावात फिरून प्रत्येक व्यक्तीच्या जन्म, मृत्यू व जातीची नोंद करण्याचे काम करीत होते. त्यामुळे जुन्या दस्तावेजांवर आजोबा, वडील, पंजोबा यांच्या जन्म, मृत्यू व जातीविषयक नोंदी आहेत. आजच्या पिढीतील व्यक्तींना अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र काढायचे असल्यास जुन्या काळातील दस्तावेजांचा पुरावा आवश्यक आहे. सदर संपूर्ण दाखले पंचायत समितीमध्ये ठेवण्यात आली आहेत. मात्र पंचायत समितीचे प्रशासन सदर दस्तावेज व्यवस्थित ठेवलेले नाही. ६० वर्षांपूर्वीचा कागद आता फाटण्याच्या मार्गावर आहे. काही कागद फाटून त्यांचे तुकडे पडले आहेत. ते एकमेकाला जोडून त्यांचा अर्थ लावावा लागत आहे. १९५५ पूर्वीचे रेकॉर्ड तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जमिनीसंदर्भात महत्त्वाचा पुरावा समजला जाणारा पी-१ हा दस्तावेज भूमिअभिलेख कार्यालयात उपलब्ध होतो. या संपूर्ण दस्तावेजांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. नवीन प्रमाणपत्र काढण्याबरोबरच न्यायालयीन कामासाठीही हे दस्तावेज अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सदर दस्तावेज जपवणूक करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जास्तीतजास्त दिवस ते दस्तावेज ठेवण्यासाठी ते व्यवस्थित कापडामध्ये बांधून ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दस्तावेजांवर पाणी गळणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र विद्यमान प्रशासनाचे या महत्त्वाच्या दस्तावेजाकडे दुर्लक्ष झाले आहे. सदर दस्तावेज नष्ट झाल्यास भविष्यात नागरिकांसमोर फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे संपूर्ण दस्तावेज स्कॅनिंग करून ठेवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.