शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात मशीनद्वारे खोदकाम; वनसंपदेला पोहोचतोय धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अहेरी उपविभागात ग्रामपंचायतींना उच्च दर्जाची ब्रॉडबँड कनकक्टिव्हिटी उपलब्ध करुन देण्याकरिता एका कंपनीद्वारे जंगलातून खोदकाम ...

ठळक मुद्देदुर्लक्ष। अहेरी उपविभागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीसाठी मशीनद्वारे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी उपविभागात ग्रामपंचायतींना उच्च दर्जाची ब्रॉडबँड कनकक्टिव्हिटी उपलब्ध करुन देण्याकरिता एका कंपनीद्वारे जंगलातून खोदकाम सुरू आहे. परंतु सदर खोदकाम जेसीबी मशीनद्वारे केले जात आहे. यात अनेक लहान वनस्पती दबून नष्ट होत आहेते तर मोठ्या वनस्पतींच्या मुळांना व खोडानांही धोका पोहोचत आहे.अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतींना उच्च दर्जाची ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘राईट आॅफ द वे’ मधून भूमिगत आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याकरिता वन विभागाने मे. स्टेरलाईट टेक्नॉलॉजिस्ट लि. नागपूर या कंपनीला अटी व शर्तींच्या अधीन राहून ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु सदर काम हे अटी व शर्तींच्या अधीन राहून केले जात नसल्याचे दिसून येत आहे. सदर कंपनीच्या वतीने जंगलातून जेसीबी मशीनद्वारे जंगलातून खोदकाम केले जात असल्याने लहान झाडे नष्ट होत आहेत. तसेच मोठ्या झाडांच्या मुळांना धोका पोहोचत आहे. सदर कंत्राटदार आपल्या मनमर्जीने हे काम करीत आहे. विशेष म्हणजे, वन क्षेत्रात काम करीत असताना वन अधिनियम १९२७ व अधिनियम १९८० मधील नियम व तरतुदींचे उल्लंघन होत आहे. अनेक झाडांची मुळासह कत्तल होत आहे. तरीसुद्धा वनविभागाचे कोणतेही अधिकारी या प्रकाराकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी तसेच सुरू असलेले काम ताबडतोब थांबवावे, अशी मागणी अहेरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुस्ताक हकीम यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष, वनमंत्री, पालकमंत्री, मुख्यवन संरक्षक, उपवनसंरक्षक यांनाही निवेदन दिले.बीबीएनएल कनेक्टिव्हिटी द्याराज्यातील सर्व ग्रामपंचायतींना भारत ब्रॉडबँड नेटवर्क लि. मार्फत आॅप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनकक्टिव्हिटी द्यावी, अशी मागणी मुस्ताक हकीम यांनी केली आहे. अहेरी उपविभागात जंगलातून सुरू असलेले खोदकाम जंगलाला हानी पोहोचविणारे आहे. त्यादृष्टीने वन विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही हकीम यांनी केली आहे.

टॅग्स :forestजंगल