आईच्या निधनानंतरही तिला आधार दिला नाही, उलट हुंड्यासाठी केला छळ ! गडचिरोली शहरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:19 IST2026-03-24T19:18:44+5:302026-03-24T19:19:43+5:30

Gadchiroli : शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका ३३ वर्षीय अधिपरिचारिकेचा हुंड्यासाठी आणि पगाराच्या पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Even after the death of her mother, she was not supported, but rather tortured for dowry! The case in Gadchiroli city | आईच्या निधनानंतरही तिला आधार दिला नाही, उलट हुंड्यासाठी केला छळ ! गडचिरोली शहरातील प्रकार

Even after the death of her mother, she was not supported, but rather tortured for dowry! The case in Gadchiroli city

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका ३३ वर्षीय अधिपरिचारिकेचा हुंड्यासाठी आणि पगाराच्या पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

निशा पंकज मेश्राम (रा. मेडिकल कॉलनी, गडचिरोली) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह ७ मार्च २०२१ रोजी पंकज ठाकूरदास मेश्राम यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच सासू आणि नणंदेने पतीचे कान भरायला सुरुवात केली. निशा यांनी स्वतःच्या नावाने प्लॉट खरेदी केल्यावर, तो सासूच्या नावे करण्यासाठी, संपूर्ण पगार सासरच्यांना देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकून मारहाण केली, असा आरोप आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल

निशा मेश्राम यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती पंकज ठाकूरदास मेश्राम, सासू संगीता ठाकूरदास मेश्राम, सासरे, ठाकूरदास बुधाजी मेश्राम, मोठी नणंद मनीषा कोमल ओंडरे, मोठे सासरे रोहिदास बुधाजी मेश्राम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार मनीषा बागमारे ह्या करीत आहेत.

पगार न दिल्यास घरातून हाकलण्याची धमकी

निशा गरोदर असतानाही त्यांना ड्युटीवर जाण्या-येण्यासाठी सहकार्य न करता त्रास देण्यात आला. तसेच हिणवण्यात आले आणि पगार न दिल्यास घरातून हाकलून देण्याची धमकी देण्यात आली.
त्यांना मानसिक आधार आईच्या मृत्यूनंतरही सासरच्यांनी देण्याऐवजी पतीला त्यांच्यापासून दूर राहण्यास भडकावले, असा आरोप निशा मेश्राम यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
 

Web Title : गढ़चिरोली: माँ की मृत्यु के बाद भी दहेज के लिए उत्पीड़न; मामला दर्ज

Web Summary : गढ़चिरोली में एक नर्स को दहेज के लिए प्रताड़ित किया गया और ससुराल वालों ने उसकी माँ की मृत्यु के बाद भी वेतन के लिए दबाव डाला। पुलिस ने पति और चार अन्य के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Gadchiroli: Woman Harassed for Dowry After Mother's Death; Case Filed

Web Summary : A nurse in Gadchiroli faced dowry harassment and pressure for her salary from her in-laws, even after her mother's death. Police have registered a case against her husband and four others.