शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला सक्षम बनवा

By admin | Updated: September 9, 2014 00:23 IST

स्त्री ही पुरूषाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाही. हे आजपर्यंत महिलांनी प्राप्त केलेल्या कामगिरीवरून दिसून आले आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव चमकविले आहे. यासाठी मुलींना शिक्षण

व्याख्यान : विनायक इरपाते यांचे प्रतिपादनगडचिरोली : स्त्री ही पुरूषाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाही. हे आजपर्यंत महिलांनी प्राप्त केलेल्या कामगिरीवरून दिसून आले आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव चमकविले आहे. यासाठी मुलींना शिक्षण देऊन सक्षम करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले. महिला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने स्त्री जीवनातील स्थित्यंतरे या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विनायक इरपाते यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा शालिनी मुनघाटे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नरेंद्र ्रमुनघाटे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या डॉ. हंसा तोमर, प्रा. डॉ. सुरेश खंगार उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. विनायक इरपाते पुढे म्हणाले की, पूर्वी स्त्रीवर बरीच बंधने लादण्यात आली होती. मुलींना शिक्षणाची दारे बंद बसल्याने त्यांची प्रगती ही थांबली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर मुलींच्या शिक्षणात कमालीची भर पडली आहे. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात मुली दिसून येतात. काही क्षेत्रात तर मुलींचीच आघाडी आहे, असे प्रतिपादन केले. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय स्त्री व स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय स्त्री जीवनातील स्थित्यंतराचा उदाहरणासह आढावा घेतला. प्रा. नरेंद्र आरेकर यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतीय स्त्रीयांच्या शोषणावर प्रकाश टाकतांना बाल - जरठ विवाह, केशवपन, सतीप्रथा या रूढींच्या नावाखाली स्त्रीयांची होणारी पिळवणूक उदाहरणाद्वारे विशद केली. शालिनी मुनघाटे यांनी अध्यक्षीय भाषनातून मुलींनी न्युनगंड बाळगू नये, जिद्द, परिश्रम, चिकाटीच्या बळावर यश संपादन करावे असे विचार मांडले. संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. परिणीता घडूले यांनी तर आभार प्रा. अनिता लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. सातपुते, प्रा. गहेरवार, प्रा. बोधाने, प्रा. त्रिपाठी, प्रा. पाटील, प्रा. जम्बेवार, प्रा. देशपांडे, प्रा. मुळे, प्रा. शिंदे, प्रा. साळवे, प्रा. पारखी, प्रा. वैद्य, प्रा. तुमडे, प्रा. कुमरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)