शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

५८४ अपंगांना मिळाले रोजगार हमी योजनचे काम

By admin | Updated: March 10, 2017 02:11 IST

ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे.

जनजागृतीची गरज : ग्रामीण भागातून मागणी कमीगडचिरोली : ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अपंग नागरिकांना रोजगारासाठी विशेष प्राधान्य दिले जाते. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५८४ अपंग मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतमजूर, अकुशल कामगार यांना बेकारीच्या कालावधीत रोजगार पुरविण्याचे काम केले जात आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत रोहयो योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अनेक योजना बंद केल्या. मात्र रोजगार हमी योजनेचे सकारात्मक परिणाम अजुनही दिसून येत असल्याने या योजनेत मात्र शासनाने कोणताही बदल न करता सदर योजना जशीच्या तशी सुरू ठेवली आहे. २०१६-१७ या वर्षात सुमारे ५ हजार ९५२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वाधिक १०० दिवसांचा रोजगार चामोर्शी तालुक्यातील १ हजार ३० कुटुंबांना उपलब्ध झाला आहे. चामोर्शी तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्या तुलनेने लहान असलेल्या धानोरा तालुक्यानेही १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात विशेष प्रगती केली आहे. धानोरा तालुक्यातील सुमारे ९४९ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे.रोहयोमध्ये अपंग नागरिकांनाही विशेष प्राधान्य दिले जात असल्याने अपंगाने कामाची मागणी केल्यानंतर त्याला रोजगार उपलब्ध करून दिल्या जाते. वर्षभरात ५८४ अपंगांना रोजगार रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र एकूण रोजगाराच्या तुलनेत हे प्रमाण अगदी नगन्य असल्याचे दिसून येत आहे. अपंग मजूर पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नाही. रोहयोचे काम मिळते, याची माहिती अपंग मजुरांना नाही. परिणामी ते कामाची मागणी करीत नसल्याचे आजपर्यंत दिसून आले. याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)