शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

१६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

देसाईगंज हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात देसाईगंज नगर परिषद वगळता सर्वच ठिकाणी ग्रामपंचायतीचे प्रशासन आहे. मात्र गावे सधन असल्याने या तालुक्यातील प्रत्येक निवडणूक नेटाने लढविली जाते. राजकीय पक्षही आपले उमेदवार उभे करून जोर लावतात. देसाईगंज तालुक्यात एकूण १९ ग्रामपंचायतींपैकी १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

ठळक मुद्देगावांमध्ये मोर्चेबांधणी : आजपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार

पुरूषोत्तम भागडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : निवडणूक विभागाने देसाईगंज तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या १६ ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १६१ उमेदवार निवडले जाणार आहेत.देसाईगंज हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात देसाईगंज नगर परिषद वगळता सर्वच ठिकाणी ग्रामपंचायतीचे प्रशासन आहे. मात्र गावे सधन असल्याने या तालुक्यातील प्रत्येक निवडणूक नेटाने लढविली जाते. राजकीय पक्षही आपले उमेदवार उभे करून जोर लावतात. देसाईगंज तालुक्यात एकूण १९ ग्रामपंचायतींपैकी १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या १६ ग्रामपंचायतींमधून १६१ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. ६ मार्चपासून नामनिर्देशनपत्र भरण्याला सुरूवात होणार असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक निवडणूक असल्याने पक्षापेक्षा उमेदवार महत्त्वाचा असल्याने काही नागरिक स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. निवडणूक कालावधी जसजसा जवळ येत आहे, तसतसा ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे शेतीचा हंगाम आता संपला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला थोडी उसंत असल्याने निवडणुकीकडे विशेष लक्ष घातले जात आहे.ग्रा.पं.निहाय सदस्य संख्यातालुक्यातील कुरूड ग्रा.पं.तून १३ सदस्य निवडले जाणार आहेत. कोंढाळा ग्रा.पं.मधून ११, कसारी ७, बोडधा ११, एकलपूर ७, चोप ११, शंकरपूर ९, विहीरगाव ७, आमगाव ११, तुळशी ९, शिवराजपूर ९, पिंपळगाव ९, विसोरा ११, पोटगाव ९, डोंगरगाव ९, किन्हाळा ९, कोकडी ग्रा.पं.मधून ९ असे एकूण १६ ग्रामपंचायतीमधून १६१ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत